अलीगड (उत्तरप्रदेश) येथे ९ कोचिंग सेंटरच्या संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद

अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना भडकावले !

अलीगड (उत्तरप्रदेश) – केंद्र सरकारच्या सैनिकांसाठीच्या ‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांत हिंसक आंदोलन करण्यात आले. उत्तरप्रदेशातील अलीगड येथेही हिंसाचार झाला. यामागे सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करणार्‍या तरुणांना शिकवणी देणार्‍या काही कोचिंग सेंटरचे संचालक असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी ९ संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

या संचालकांनी विद्यार्थ्यांना सरकारच्या विरोधात भडकावून हिंसाचार करण्यास प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एका संचालकाला अटक करण्यात आली असून त्याने शस्त्र हातात घेण्याचे आवाहन करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली होती. काही जणांनी याविषयीचा व्हिडिओ बनवून प्रसारित केला होता.