नोएडा(उत्तरप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली पाद्य्राकडून हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर ! – विहिंप

नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील ‘सेक्टर १२’च्या ‘बी ब्लॉक’मधील एका घरात हिंदु मुलांना विनामूल्य शिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याचा आरोप विश्‍व हिंदु परिषदेने केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेल्यावर तेथे ५० विद्यार्थी आढळून आले. ‘त्यांचे धर्मांतर करण्यात आले आहे का किंवा करण्यात येणार आहे का ?’ याची पोलीस चौकशी करत आहेत.

येथे ‘लिटिल फ्लॉक’ नावाची खासगी संस्था पाद्री फिलीप अब्राहम याच्याकडून चालवण्यात येत आहे. तो मूळचा केरळ येथील रहाणारा आहे. तो त्याच्या बंगल्यामधून ही संस्था चालवत आहे. येथे तो विनामूल्य शिक्षण देण्याच्या नावाखाली मुलांचे धर्मांतर करतो, असा आरोप आहे. शिक्षणासह येथे विनामूल्य शिवणकाम आणि वैद्यकीय शिक्षण दिले जात आहे.

संपादकीय भूमिका

या गंभीर आरोपाची नोंद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, तसेच पाद्री दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंची अपेक्षा आहे !