संयुक्त अरब अमिरातकडून भारतीय गव्हाच्या निर्यातीस स्थगिती

अबुधाबी – भारतीय गहू आणि गव्हाचे पीठ यांची निर्यात ४ मासांसाठी स्थगित करण्याचा निर्णय संयुक्त अरब अमिरातने घेतला. भारताने १४ मे २०२२ या दिवशी गव्हाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता, त्यानंतर संयुक्त अरब अमिरातने हे पाऊल उचलले आहे. परिणामी भारतीय गहू संयुक्त अरब अमिरातमार्गे अन्य देशांत पोहोचू शकत नाही. ‘१३ मे पूर्वी देशात आणलेला भारतीय गहू निर्यात करू इच्छिणार्‍या आस्थापनांना आधी अमिरातच्या अर्थ मंत्रालयाकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतरच त्यांना अनुमती दिली जाईल’, असेही संयुक्त अरब अमिरातने स्पष्ट केले.