केंद्रीय मंत्रीमंडळाची ‘५ जी स्पेक्ट्रम’च्या (ध्वनीलहरींच्या) लिलावाला संमती

नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाने ‘५ जी स्पेक्ट्रम’च्या लिलावाला संमती दिली आहे. जुलै मासाच्या शेवटपर्यंत हा लिलाव होणार असून संबंधित करार हे २० वर्षांच्या वैधतेसह एकूण ७२०९७.८५ ‘मेगाहर्ट्झ’ स्पेक्ट्रमसाठी असतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

यशस्वी बोली लावणार्‍यांना ‘५ जी’ सेवा प्रदान करण्यासाठी नियुक्त केले जाईल.