नूपुर शर्मा यांच्या विरोधात कुवैतमध्ये आंदोलन करणार्‍या विदेशी नागरिकांची हकालपट्टी होणार !

कुवैत सिटी (कुवैत) – नूपुर शर्मा यांनी केलेल्या पैगंबर यांच्या कथित अवमानाच्या विरोधात कुवैतच्या फहील भागात विदेशांतून कामासाठी आलेल्या नागरिकांकडून निदर्शने करण्यात आली. यानंतर कुवैत सरकारने या आंदोलकांना अटक करण्यासह त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला. यासह त्यांना पुन्हा कुवैतमध्ये येण्यावर बंदी घातली. शुक्रवारच्या नमाजानंतर या लोकांनी येथे निदर्शने केली होती. यात कोणत्या देशांचे नागरिक आहेत, हे समजू शकलेले नाही. कुवैतच्या कायद्यानुसार हा गुन्हा आहे. कुवैतमध्ये काम करणार्‍या एकूण भारतियांची संख्या अनुमाने साडेचार लाख इथकी आहे.

कुवैत सरकारने म्हटले आहे की, अशा प्रकारची कारवाई करून एक उदाहरण समोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे भविष्यात कोणताही विदेशी नागरिक अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी होणार नाही.

संपादकीय भूमिका

भारतात घुसखोरी करणार्‍यांचीही हकालपट्टी होत नाही, तेथे अन्य देशांतील घटनाच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍यांची हकालपट्टी कधीतरी होईल का ?