राजस्थानमधील काँग्रेसी मंत्र्याच्या मुलाने बलात्कार केलेल्या पीडितेवर आक्रमण

  • मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित याच्याविरुद्ध गुन्हा नोंद

  • तक्रार मागे घेण्यासाठी रोहित याच्याकडून पीडितेवर दबाव

नवी देहली – येथील काँग्रेस सरकारमधील मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित याने एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप असून पीडितेने त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. ‘११ जून या दिवशी दोन जणांनी आक्रमण करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप पीडितेेने केला. त्यांनी तिच्यावर एक द्रव फेकले, जे तिच्या चेहर्‍यावर आणि हातावर पडले. पीडितेने पोलिसांत नोंदवलेला गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी तिला धमकावले.

१. पीडितेने रोहित जोशी याच्यावर देहलीमध्ये बलात्कार करून बलपूर्वक गर्भपात करायला लावण्यासह अनेक गंभीर कलमांखाली पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

२. तक्रारीत म्हटले आहे की, रोहितने पीडितेला अनेक वेळा गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिला मारहाणही केली.

३. पीडितेने तिची आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षा धोक्यात असून तिला सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली.

४. पोलिसांनी रोहितची सखोल चौकशी चालू केली असून त्याला त्याचा भ्रमणभाष पोलिसांकडे जमा करण्याचा आदेश दिला आहे. चौकशीच्या दुसर्‍या दिवशी पीडितेवर आक्रमण करण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसी मंत्री महेश जोशी यांच्या मुलावर असलेला बलात्काराचा गंभीर गुन्हा पहाता जोशी यांनी यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक असतांना ते अजूनपर्यंत यावर मौन का बाळगून आहेत ?
  • देशातील अनेक राजकारण्यांचे नातेवाईक जनतेचे भक्षक असल्याप्रमाणे वर्तन करतात. आता रोहितचे अन्वेषण करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, तरच इतरांवर वचक बसेल !