नूपुर शर्मा यांच्या विरोधात मुसलमानांनी केलेल्या दंगलींचे प्रकरण
लक्ष्मणपुरी – नूपुर शर्मा यांच्या विरोधात १० जूनच्या शुक्रवारच्या नमाजानंतर भारतभरात १४ राज्यांमध्ये ९० हून अधिक ठिकाणी मुसलमानांनी एकाच वेळी मोर्चा काढला. नूपुर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने करण्यात आली. उत्तरप्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर आणि मुरादाबाद या ठिकाणी दगडफेक अन् जाळपोळीच्या घटना घडल्या. सरकारी संपत्तीची हानी केल्यामुळे दंगलखोर मुसलमानांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या सर्वांच्या विरोधात ‘गँगस्टर अॅक्ट’च्या अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती उत्तरप्रदेशचे साहाय्यक पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.
शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये कठोर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला.
उत्तर प्रदेश में जुमे की नमाज के बाद हुए बवाल पर एक्शन में योगी सरकार, प्रदर्शनकारियों पर लगेगा गैंगस्टर एक्ट; संपत्ति भी होगी जब्त#CMYogi | #UPPolice | #JumaNamazhttps://t.co/W2NVEHzmXS
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) June 11, 2022
अशी कारवाई करणार उत्तरप्रदेश पोलीस !
उत्तरप्रदेशचे साहाय्यक पोलीस महासंचालक प्रशांत कुमार म्हणाले, ‘‘दंगल झाल्यानंतर काही वेळातच १०९ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. सरकारी आणि खासगी मालमत्तेची हानी करणार्यांकडून त्याची वसुली केली जाईल. त्यांची संपत्ती जप्त केली जाईल. शांतता भंग करणार्यांची गय केली जाणार नाही आणि त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.’’
संपादकीय भूमिका१० जून या दिवशी देशभरात १४ राज्यांमध्ये मुसलमानांनी हैदोस घातला. या पार्श्वभूमीवर सर्व भाजपशासित सरकारांनी तरी हिंसाचारी मुसलमानांवर उत्तरप्रदेशप्रमाणे कठोर कारवाई करावी, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते ! |