हिंदु जनजागृती समिती आयोजित दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची रूपरेषा

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात, हिंदूंचा होणारा छळ आणि हे रोखण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटनाची आवश्यकता या सूत्रांना केंद्रभूत ठेवून यंदा १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या अंतर्गत प्रत्येक दिवशी होणाऱ्या विविध सत्रांविषयी माहिती देणारी रूपरेषा येथे दिली आहे.