अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभागी झाल्यामुळे भारतातील अन्य राज्यांतील हिंदूंची कठीण परिस्थिती लक्षात येणे आणि ‘आपण साधना पुष्कळ वाढवायला पाहिजे’, याची जाणीव होणे
‘मला अष्टम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनात सहभागी होण्याची संधी मिळाली. या अधिवेशनात अनेक राज्यांतून हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. ते सर्व जण स्वत:चे अनुभव कथन करत असतांना ‘भारतातील पुष्कळ राज्यांत हिंदूंची परिस्थिती कठीण आहे’, असे लक्षात आले. आसाम राज्यातील परिस्थिती भयानक आहे. आसाममधील ९ जिल्हे मुसलमानबहुल आहेत. त्यामुळे तेथील हिंदूंना जगणे आणि उदरनिर्वाह करणे पुष्कळ कठीण झाले आहे. त्या ठिकाणच्या एक महिला हिंदु धर्माभिमानी म्हणाल्या, ‘‘आपण घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा घरी यायची शाश्वती नाही.’’ तेव्हा लक्षात आले, ‘आपण सनातनच्या आश्रमात आहोत आणि गोव्यात तशी परिस्थिती नाही, तर आपण साधना किती वाढवायला पाहिजे ?’ ‘ईश्वराने ही परिस्थिती लक्षात आणून दिली’, त्यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि प्रार्थना करतो, ‘हे भगवंता, ‘तूच अधिवेशनाच्या माध्यमातून ही सूत्रे आमच्या लक्षात आणून दिलीस. आम्हाला झोकून देऊन सेवा करण्यासाठी बळ दे.’
– श्री. सुरजित नारायण जगदीश माथूर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०१९)