कॉन्व्हेंटमधील भ्रष्टाचाराची तक्रार करणार्‍या ननचा छळ आणि लैंगिक शोषण !

मैसुरू (कर्नाटक) – येथील रामपुरा भागातील ‘डॉटर ऑफ लेडी ऑफ मर्सी कॉन्व्हेंट’मध्ये काम करणार्‍या एल्सीना या ननने दावा केला आहे की, तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. याविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यावर तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तिने या सदंर्भात माहिती देणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे.

१. एल्सीना यांनी आरोप केला की, त्यांनी कर्नाटक महिला आयोगाकडे कॉन्व्हेंटमधील भ्रष्टाचाराविषयी तक्रार केली होती. त्यांना ही तक्रार मागे घेण्यास सांगण्यात आले असता, त्यास त्यांनी नकार दिला. यानंतर त्यांचा छळ करण्यात आला. त्यांना बलपूर्वक कॉन्व्हेंटच्या मनोरुग्णांसाठीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले. एल्सीना यांच्या नातेवाईक आणि पोलीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून जाऊ देण्यात आले; मात्र कान्व्हेंटमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

२. एल्सीना ४५ वर्षांच्या आहेत. त्या कर्नाटकातील कोडागु येथील एका एका शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यानंतर त्या वरील कान्व्हेंटमध्ये शिकवू लागल्या. ३ मासांतच त्यांना तेथील भ्रष्टाचार लक्षात आल्याने त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

संपादकीय भूमिका

ख्रिस्तींना सभ्य आणि सुसंस्कृत समजणारे याकडे लक्ष देतील का ?