(‘मॉडेल’ म्हणजे एखाद्या विशिष्ट आस्थापनाने बनवलेले कपडे अथवा अन्य साहित्य यांचा प्रसार करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती.)
काबूल (अफगाणिस्तान) – इस्लामचे कट्टरतेने पालन करणाऱ्या अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने प्रसिद्ध मॉडेल अजमल याला इस्लाम आणि कुराण यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. तसेच त्याच्या २ सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. अजमलचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे ज्यामध्ये तो त्याच्या सहकाऱ्यांसमवेत विनोदी पद्धतीने कुराणमधील आयातांचे (वाक्यांचे) वाचन करत आहे.
तालिबानने अटक केल्यानंतर अजमल आणि त्याचे सहकारी यांचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये हे तिघे कारागृहातील कपड्यांमध्ये दिसत असून तालिबान सरकार आणि धर्मगुरु यांची क्षमा मागत असतांना दिसत आहेत. तालिबानने याप्रकरणी अधिकृतपणे भष्य करण्यास नकार दिला आहे. तसेच ‘अजमल आणि त्याचे सहकारी यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे ?’ हे स्पष्ट केलेले नाही.
संपादकीय भूमिकाभारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अवमान करणाऱ्यांवर कधी अशी कारवाई होते का ? |