आता १२ ऐवजी २४ तिकिटांचे ऑनलाइन रेल्वे आरक्षण करता येणार !

नवी देहली – ‘आयआर्सीटीसी’ या ऑनलाइन रेल्वे आरक्षण करणाऱ्या संकेतस्थळाद्वारे यापुढे महिन्याकाठी १२ ऐवजी २४ तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे, अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. त्यासाठी वापरकर्त्याचे ‘आयआर्सीटीसी’वरील खाते त्याच्या ‘आधार कार्ड’शी लिंक (जोडलेले) असणे आवश्यक आहे. तसेच ज्यांचे आधारकार्ड त्यांच्या खात्याशी जोडलेले नाही, अशांना ऑनलाइन आरक्षण करण्याची मर्यादाही ६ वरून १२ इतकी करण्यात आली आहे.