(म्हणे) ‘मुसलमानाने हिंदूंच्या देवतांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याची एकही घटना मला आठवत नाही !’

नुपूर शर्मा प्रकरणी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा साळसूदपणा

नवी देहली – मुसलमान व्यक्तीने हिंदूंच्या देवतांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याची एकही घटना मला आठवत नाही, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या कथित केलेल्या अवमानाविषयी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,

१. या लोकांमध्ये (नूपुर शर्मा यांच्यासारख्या) चांगली भावना निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकांना ट्विटरवर ‘फॉलो’ करतात. त्यांनी काही तरी केले पाहिजे, त्यांनी हे विष अजून पसरण्यापासून रोखले पाहिजे.

२. नुपूर शर्मा यांना ठार मारण्याच्या धमक्या मिळत असतील, तर त्याचा निषेध केला पाहिजे. तशा पद्धतीने विचार करणेही चुकीचे आहे; म्हणूनच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सध्या त्या स्थितीत आहेत. त्या देशांचे अनुकरण आपल्याला करायचे नाही; पण आपण ते थोड्याफार पद्धतीने करत आहोत. गायींची हत्या केल्याच्या संशयात लोकांना मारले जात आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे रेखाटली, ते नसीरुद्दीन शाह कसे विसरतात ?
  • मुसलमान आक्रमकांनी या देशातील हिंदूंची सहस्रो मंदिरे पाडली, हा इतिहास शाह का सांगत नाहीत ? आताही देशातील अनेक भागात शाह यांच्या धर्मबांधवांकडून हिंदूंच्या मंदिरावर आक्रमणे केली जातात, मशिदीजवळून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका गेल्यावर त्यांवर आक्रमणे होतात, हे शाह यांना कसे दिसत नाही ?
  • ज्ञानवापीच्या प्रकरणी अनेक इस्लामी धार्मिक नेते शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह विधाने करत आहेत, हे शाह यांना कसे ऐकू येत नाही ?