परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दर्शनाच्या वेळी कर्नाटकातील साधकांना आलेल्या अनुभूती

१. ‘या आपत्काळात परात्पर गुरु डॉ. आठवलेरूपी श्रीमन्नारायणाचे दर्शन मिळाले’, या विचाराने भावजागृती होणे

‘आताच्या आपत्काळाच्या वेळी साक्षात् श्रीमन्नारायणाचे दर्शन मिळाले’, या विचाराने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांकडे पाहिल्यानंतर माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. गुरुदेवांनी सांगितलेली स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया करत नसणाऱ्या या अपराधी जिवाला त्यांचे दर्शन मिळाले. ‘जर व्यष्टी साधना चांगली केली, तर गुरुदेवांची अजून कितीतरी कृपा होईल’, असे वाटले.’ – श्री. विनय दानप्पागौडर, बेंगळुरू, कर्नाटक.

२. ‘प.पू. गुरुदेव हे साक्षात् श्री विष्णु आणि शिव आहेत’, असे जाणवून त्यांच्या दर्शनाने कृतज्ञता दाटून येणे

‘प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर ‘ते साक्षात् श्री विष्णु आणि शिव आहेत’, असे जाणवले. त्यांचे मार्गदर्शन ऐकून आनंद झाला. अशा गुरुदेवांचे दर्शन आम्हाला पूर्वपुण्याईने मिळाले असावे. ‘त्यांचे आज्ञापालन केले पाहिजे’, असे वाटले. अशा गुरूंच्या दर्शनाने अत्यंत कृतज्ञता दाटून आली.’ – श्री. शशांक पाटील, कर्नाटक

३. मायेत असणाऱ्या जिवाला साधना समजावून सांगणाऱ्या प.पू. गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटणे

‘गुरुदेवांच्या सत्संगाला बोलावल्यावर आनंद झाला. प.पू. गुरुदेवांना पाहून आनंद झाला. गुरुदेव प्रत्येक साधकाचा विचार करतात. गुरुदेव जवळ असतांना काही जाणवले नाही; पण ते निघून गेल्यानंतर पुष्कळ भावजागृती झाली. मायेत असणाऱ्या आम्हाला गुरुदेवांनी साधना समजावून सांगितली. त्यासाठी सतत कृतज्ञ आहे.’ – श्री. रमेश, मंगळुरू, कर्नाटक.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक