गुजरातमध्ये पाकच्या बोटीतील २५० कोटी रुपयांचे हेरॉईन (अमली पदार्थ) जप्त !

हेरॉईन (अमली पदार्थ)

कर्णावती (गुजरात) – आतंकवादी विरोधी पथकाने (‘एटीएस्’ने) राज्याच्या कच्छमधून एका पाकिस्तानी बोटीतील ५० किलो हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत २५० कोटी रुपये आहे. सीमा सुरक्षा दलाच्या साहाय्याने एटीएस्ने ही कारवाई केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब्रा बंदरातून ५०० किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. पाकिस्तानी बोटीतून हेरॉईनचा साठा भारतात आणला जात असल्याची माहिती एटीएस्ला मिळाली होती. संशयित बोटीचा पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका

भारतियांना व्यसनाधीन बनवण्याचा पाकचा डाव जाणा ! पाकचे असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, असा धडा भारताने त्याला शिकवणे आवश्यक !