पाक सरकार आणि ‘तहरीक-ए-पाकिस्तान’ यांच्यातील संघर्ष विराम अनिश्चित काळासाठी वाढवला !

प्रातिनिधिक छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सरकार आणि बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-पाकिस्तान’ (टीटीपी) यांच्यातील ‘संघर्ष विराम’ अनिश्चित काळापर्यंत वाढण्यावर सहमती झाली आहे; मात्र याविषयी अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दोघांकडूनही देण्यात आलेली नाही. ३० मे या दिवशी संघर्ष विरामचा कालावधी संपला होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. टीटीपी ही संघटना  अल् कायदाच्या जवळची मानली जाते. पाकच्या सीमेवरील भागात तिच्याकडून अनेक आक्रमणे करण्यात आली आहेत.