
एकदा एका साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांना त्याच्या अडचणी विचारल्या. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला विचारले, ‘‘तुम्ही सूचनासत्रे करता का ?’’ तेव्हा त्याने सांगितले, ‘‘हो. मला सूचना बनवून दिल्या आहेत. त्या मी वाचतो.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना सांगितले, ‘‘सूचनासत्र केवळ वाचून केल्याने त्याचा परिणाम होत नाही. सूचनासत्र मनात परत परत चिंतन करून केल्यास सूचना अंतर्मनात जातात. केवळ वाचून केले, तर बाह्यमनातच रहातात.’’
परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीने मी सूचनासत्र करण्यास प्रारंभ केला. त्या पद्धतीने डोळे झाकून सूचनासत्र करतांना मला झोप येणे, सूचना उलट दिली जाणे (सकारात्मक ऐवजी नकारात्मक), पोटात ढवळून ‘उलटी होईल’, असे वाटणे इत्यादी विविध त्रास होऊ लागले. त्यामुळे एकाग्रतेने सत्र होत नव्हते. त्यामुळे ‘सत्रसंख्या पूर्ण करायची असतील, तर सत्रे वाचून करावी लागतात’, असे माझ्या लक्षात आले.
‘सूचनासत्र करण्यापूर्वी उपाय करावे’, जेणेकरून सूचनासत्रातील अडथळे दूर होतील’, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी ‘नामजपाचे मंडल घालून बसणे, स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, नामजप करणे’ इत्यादी उपाय करू लागलो. सूचनासत्र पाठ करून करतांना ८ मिनिटांचे सत्र करण्यास २५ मिनिटे लागतात. हे टाळण्यासाठी मी सूचनासत्र वाचून करतो. असे करणे योग्य आहे का ?’
वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेला साधक सूचनासत्र मनात करतांना तीव्र त्रास होत असल्याने ते वाचून करतो, हे योग्य आहे का ?

‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या साधकांनी सूचनासत्र करण्यापूर्वी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे योग्य आहे. त्या वेळी वाईट शक्तींचा थोडा विरोध होईल. तेव्हा त्रास सहन करणे शक्य होईपर्यंत उपाय करावेत. त्यानंतर उपाय करणे थांबवावे. उपाय केल्यामुळे वाईट शक्तींचा जोर थोडा अल्प होईल आणि तेव्हा सूचनासत्र मनात करणे थोडेफार शक्य होईल. एका वेळी सूचनासत्र करतांना एक स्वयंसूचना मनाला ४ ते ५ वेळा देतो आणि अशा प्रकारे २ ते ३ स्वयंसूचना एका वेळी मनाला देतो. सूचनासत्र करतांना ज्या वेळी त्रासामुळे डोळे मिटून एकाग्रतेने मनाला स्वयंसूचना देणे अशक्य होईल, तेव्हा स्वयंसूचना वाचून मनाला द्यावी. असे करत गेल्यास काही दिवसांनी वाईट शक्तींचा जोर आणखी अल्प होईल आणि तेव्हा डोळे मिटून अधिकाधिक संख्येने स्वयंसूचना मनाला देणे शक्य होईल.’
– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (२६.२.२०२५)
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२५)
|