आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग १६)

पू. तनुजा ठाकूर

१. देवतांची कृपा आवश्यक असणे; परंतु सध्या सर्व स्थानांच्या अधिष्ठाता देवता किंवा देवी यांची लोकांवर अवकृपा होणे

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारी आणि अन्य नैसर्गिक आपत्ती स्वतःचे अक्राळविक्राळ रूप दाखवत आहेत. अशा स्थितीत देवताच आपले रक्षण करू शकतात. यासाठी स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, कुलदेवता, तसेच गुरु या सर्वांची कृपा अत्यंत आवश्यक आहे. या सर्वांना प्रसन्न कसे करून घ्यावे ? हिंदु धर्मात जेव्हा एखादी पूजा, अनुष्ठान आणि यज्ञ पार पडतो, तेव्हा सर्व देवतांना प्रसन्न करण्यासाठी आहुती दिली जाते किंवा त्यांचे पंचोपचार पूजन केले जाते. आज सर्व मोठ्या नगरांमध्ये कोरोनाचा प्रकोप एवढा अधिक प्रमाणात का आहे ? आपण कधी याचा विचार केला आहे का ? या सर्व स्थानांच्या अधिष्ठाता देवता किंवा देवी यांची लोकांवर अवकृपा झाली आहे.

२. महानगरातील लोकांनी आपल्या स्थानदेवतेला प्रसन्न करायला हवे !

ग्रामीण भागात स्थानदेवता किंवा ग्रामदेवता यांच्या नावाने वार्षिक उत्सव साजरा होत असतो. जर महानगरातील लोकांनी आपल्या स्थानदेवतेला प्रसन्न करण्यासाठी योग्य साधना केली, तर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रकोपांपासून वाचता येऊ शकते; परंतु निधर्मी व्यवस्थेत हे कसे समजावले जाणार ? आपल्या मूळ गावात रहाण्यायोग्य ठिकाण बनवून ठेवावे; कारण येणाऱ्या काळात महानगरात रहाणे अजूनच त्रासदायक होणार आहे. पुढील २-३ वर्षांत त्रास एवढे वाढणार आहेत की, त्यातून महानगरातील लोकसुद्धा देवतेची समष्टी उपासनाही करू लागतील. कलियुगात जिवाला त्रास आणि दुःख हेच ईश्वराच्या भक्तीसाठी उद्युक्त करू शकते.

३. प्रवासात असतांना व्यष्टी साधना कशी केली जाते ?

एकदा मी बंगालमध्ये धर्मप्रसारासाठी गेले असतांना मला एक प्रौढ वयातील साम्यवादी भेटले होते. मी प्रवास करतांना नेहमीच जपमाळ, प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि माझे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ग्रंथ माझ्या समवेत ठेवते. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा मी एकतर नामजप करते किंवा प.पू. बाबांची भजने ऐकते. त्यामुळे माझे मन त्वरित निर्विचार होते. कधी कधी भजने ऐकत ध्यान लावते किंवा श्रीगुरूंचे ग्रंथ वाचते. अन्य वेळी मला माझी व्यष्टी साधना करण्यासाठी वेळच मिळत नाही. (क्रमशः)

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)