मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचा भारत सरकारच्या सचिव पदाच्या निवडसूचीत समावेश !

मुंबई – महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचा भारत सरकारचे सचिव या पदासाठीच्या निवडसूचीत समावेश झाला आहे. याविषयीची माहिती त्यांनी स्वतःच सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहे. केंद्रशासनामध्ये प्रतिनियुक्ती किंवा स्थानांतर यांद्वारे त्यांची नियुक्ती भारत सरकारचे सचिव या पदावर होऊ शकते. भारत सरकारचे सचिव हे प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद समजले जाते.