पाणीप्रश्नी बुरुडगाव (नगर) ग्रामस्‍थांची आत्मदहन करण्याची चेतावणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

नगर – येथील बुरुडगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने याविषयी आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले होते. आयुक्त गोरे यांनी २५ एप्रिलपर्यंत कामाला प्रारंभ करण्याचे लेखी पत्र दिले होते; मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता ३० मेपर्यंत पाईप लाईनच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाला नाही, तर ३१ मे या दिवशी आयुक्तांच्या दालनासमोर आत्मदहन करणार असल्याची चेतावणी बापूसाहेब कुलट आणि ग्रामस्थ यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आत्मदहनाची चेतावणी द्यायला लावणारे जनताद्रोही प्रशासन !