नमाजपठणाचा व्हिडिओ प्रसारित करणार्या यू ट्यूब चॅनलवर गुन्हा नोंद !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील कर्नाटक उच्च न्यायालयात ज्या ठिकाणी मुख्य न्यायाधीश बसतात त्या ठिकाणी दोन महिलांनी नमाजपठण केल्याचा एक व्हिडिओ ‘संवाद’ या यू ट्यूब चॅनवरून प्रसारित करण्यात आला. ‘कर्नाटक उच्च न्यायालयात नमाज’ असे याला शीर्षक देण्यात आले आहे. विनाअनुमती न्यायालयात चित्रीकरण केल्यावरून ‘संवाद’ यू ट्यूब चॅनलच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित केल्याने दोन धर्मांच्या विरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न आहे’, असे आरोपात म्हटले आहे. आता यू ट्यूब वरून हा व्हिडिओ हटवण्यात आला आहे. अधिवक्ता आर्. पुट्टरैय्या यांनी न्यायाधिशांच्या ठिकाणी नमाजपठण केल्यावरून २ महिलांच्या विरोधात न्यायालयाच्या रजिस्टारकडे तक्रार नोंदवली आहे. (मुळात अशी मागणी का करावी लागते ? न्यायालय प्रशासनाला हे चुकीचे वाटत नाही का ? कि त्यांनी यासाठी अनुमती दिली आहे ? – संपादक)
संपादकीय भूमिकामहिलांना मशिदीमध्ये नमाजपठण करण्यास अनुमती दिली जात नसतांना त्यांना न्यायालयात विनाअनुमती नमाजपठण करता येते का ? |