मुसलमानांना ज्ञानवापी परिसरात येण्यापासून रोखण्यासाठी याचिका !

ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशिदीच्या मुख्य प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे या दिवशी होणार आहे. याआधी न्यायालयात आणखी एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. विश्‍व वैदिक सनातन संघाचे आंतरराष्ट्रीय महामंत्री किरण सिंह यांच्या वतीने प्रविष्ट केलेल्या या याचिकेत ‘ज्ञानवापी परिसरात येण्यापासून मुसलमानांना रोखण्यात यावे’, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसह ज्ञानवापी परिसर हिंदु पक्षाकडे सोपवण्यात यावा आणि तेथे तात्काळ पूजापाठ आरंभ करण्याच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत. अर्थात् सर्वोच्च न्यायालयाने या परिसरात आहे ती स्थिती राखण्याचा आदेश दिल्याने सध्यातरी या मागण्या मान्य करणे शक्य नाही.