सौदी अरेबियाकडून भारतासह १६ देशांच्या प्रवाशांवर बंदी

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे निर्णय

प्रातिनिधिक छायाचित्र

रियाध (सौदी अरेबिया) – कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सौदी अरेबियाच्या पासपोर्ट कार्यालयाने भारतासह १६ देशांच्या प्रवाशांवर बंदी घातली. या देशांमध्ये ईराण, तुर्कस्तान, येमेन, व्हिएतनाम, कांगो, इथिओपिया, व्हेनेझुएला आदी देशांचा समावेश आहे. सौदीच्या या निर्णयाचा तेथे काम करणार्‍या लाखो भारतियांना त्रास होण्याची शक्यता आहे. सौदीतील ज्या लोकांना अरब देशांमध्ये जायचे आहे, त्यांच्या पासपोर्टची वैधता ३ मासांहून अधिक, तर सौदीतील जे लोक अरबी देश सोडून अन्य देशांत जाऊ इच्छितात, त्यांच्या पासपोर्टची वैधता ६ मासांपेक्षा अधिक असली पाहिजे.

सौदीत ‘मंकीपॉक्स’चा रुग्ण नाही !

सध्या अनेक देशांत थैमान घालणार्‍या ‘मंकीपॉक्स’ या साथीच्या रोगाचा सौदी अरेबियात अद्यापपर्यंत एकही रुग्ण सापडलेला नाही. असा रुग्ण सापडला, तरी सरकार या रोगाचा सामना करण्यास समर्थ आहे, अशी माहिती सौदीच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.