महागाई, बेरोजगारी यांविरोधात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा राज्यव्यापी आंदोलन करणार !

२५ ते ३१ मे या कालावधीत आंदोलन

मुंबई – वाढती महागाई, बेरोजगारी या सूत्रांवर राज्यामध्ये संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने २५ ते ३१ मे या कालावधीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांविरुद्ध निदर्शने करण्यात येणार आहेत. संयुक्त शेतकरी कामगार मोर्च्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार विद्या चव्हाण, प्रकाश रेड्डी, प्रतिभा शिंदे, अधिवक्ता राजू कोरडे, डॉ. एस्. के. रेगे, प्रभाकर नारकर, धनंजय शिंदे, विजय कुलकर्णी, फिरोझ मिठीबोरवाला आदी उपस्थित होते. (या बैठकीला उपस्थित असलेल्यांची सूची पहिली, तर हे शेतकरी हितचिंतक आहेत का ? असा प्रश्न कुणालाही पडेल ! – संपादक)