आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

 (भाग ९)

पू. तनुजा ठाकूर

१. जगन्नाथपुरी येथील हिंदुपिठात मातीच्या भांड्यांत आणि लाकडाच्या चुलीवरच महाप्रसाद बनवला जाणे अन् महाप्रसादाची अद्भुत चव म्हणजे तेथील चैतन्याचाच प्रभाव असणे

जगन्नाथपुरी येथील मंदिरात आजही मातीच्या भांड्यांत आणि लाकडाच्या चुलीवर महाप्रसाद बनवला जातो. तेथे प्रतिदिन लक्षावधी लोक महाप्रसाद ग्रहण करतात. तेथील लोक आधुनिक यंत्रे आणि स्टीलची भांडी यांच्यात महाप्रसाद बनवू शकत नाहीत का ? पण तसे होत नाही. प्रत्यक्षात जगन्नाथपुरी हे स्थान हिंदूंच्या चार महत्त्वाच्या पिठांपैकी एक आहे. त्यामुळे तेथील सात्त्विकता टिकवून ठेवणे, हा हिंदूंचा धर्म आहे. तेथील महाप्रसादाची चव अद्भुत असते. ही चव म्हणजे तेथे असलेल्या चैतन्याचाच प्रभाव. पूर्वीच्या काळी ते चैतन्य सर्वांच्या घरी बनवल्या जाणाऱ्या महाप्रसादातूनही अनुभवता येत असे; पण आज धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावामुळे ते चैतन्य नसल्यासारखेच झाले आहे.

२. जेवण प्रसाद स्वरूपात बनवण्याची कला आत्मसात केल्यासच शरीर आणि मन शुद्ध अन् पवित्र होईल !

मी तुम्हाला अन्नपूर्णाकक्षात देवत्व निर्माण करण्याविषयी काही सूत्रे सांगितली. मला ठाऊक आहे की, हे सूत्र कटू सत्य आहे. त्यामुळे तुम्हाला वाईटही वाटत असेल; परंतु कुणाला ना कुणाला तरी हे सांगावेच लागेल. जोपर्यंत आपण जेवण हे प्रसाद स्वरूपात बनवण्याची कला शिकत नाही, तोपर्यंत शरीर आणि मन हे शुद्ध, स्वस्थ अन् पवित्र होऊ शकणार नाही.

(क्रमशः)

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)