परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी हरियाणा येथील साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

१३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्याच्या वेळी हरियाणा येथील साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. त्रासदायक अनुभूती

१ अ. श्रीमती ममता अरोडा, फरिदाबाद

‘सोहळ्याच्या आदल्या दिवशी मला त्रास होत होता. सोहळ्याला आरंभ झाल्यानंतरही माझ्या पोटात दुखत होते. मला बसवत नव्हते. रिकाम्या खोक्यांचे उपाय केल्यानंतर माझा त्रास दूर झाला.’

२. चांगल्या अनुभूती

२ अ. श्रीमती वंदना सचदेवा, फरिदाबाद

२ अ १. कुंडीत लावलेल्या मोगऱ्याच्या झाडाला एकच फूल येणे आणि ते फूल परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला वाहिल्यावर रात्रीपर्यंत टवटवीत रहाणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी कुंडीत लावलेल्या मोगऱ्याच्या झाडावर एकच फूल आले होते. ते पाहून मी ‘भगवंताने आजच्या दिवसासाठीच हे एक फूल दिले आहे’, असा भाव ठेवला. मी ते फूल आणि तुळशीपत्र परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला वाहिले. ते रात्रीपर्यंत टवटवीत राहिले होते.’

२ आ. कु. पूनम किंगर, फरिदाबाद

२ आ १. ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घातलेला गजरा आणि श्री भवानीमातेच्या गळ्यातील हार यांचा सुगंध येत आहे’, असे जाणवणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना ‘माझ्या खांद्याजवळ मोगऱ्याची पुष्कळ फुले आहेत आणि मला त्यांचा सुगंध येत आहे’, असे मला जाणवले. ‘गजरा घातल्यावर सुगंध यावा तसे वाटत होते; मात्र मी गजरा घातलेला नव्हता. ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी गजरा घातला होता. माझे लक्ष केवळ त्याच दृश्याकडे गेले. तेव्हा त्या श्री भवानीमातेची पूजा करत होत्या. श्री भवानीमातेच्या गळ्यात फुलांचा हार होता. तेव्हा मला जाणीव झाली, ‘हा सुगंध तेथूनच येत आहे.’

२ इ. श्रीमती पूनम अरोडा, फरिदाबाद

२ इ १. परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन ऐकल्यावर मनातील शंकांचे निरसन होणे : ‘काही वर्षांपासून माझ्या मनात व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी प्रश्न येत होते. साधकांनी त्याविषयी सांगूनही ते माझ्या लक्षात येत नव्हते. १३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. त्यातील त्यांचे मार्गदर्शन ऐकून माझ्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले. आता मनात कधीही स्वयंसूचना सत्राविषयी विचार आल्यास मला परात्पर गुरु डॉक्टरांचे शब्द ऐकू येतात, ‘कर्म करा. फळाची चिंता करू नका.’

२ ई. श्रीमती शिल्पा चास्कर, फरिदाबाद

२ ई १. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त त्यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र-चकती पहात असतांना मला वाटले, ‘मीही त्या साधकांच्या समवेत बसले आहे.’

२ ई २. रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे आगमन होत असल्याची ध्वनीचित्र-चकती पहातांना आलेली अनुभूती : रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे आगमन होत असल्याची ध्वनीचित्र-चकती पहातांना माझ्या मनात विचार आले, ‘कुलदेवीच्या दर्शनाला गेल्यावर तेथे किती गर्दी असते आणि केवढी लांबलचक रांग असते ! सर्वांना धक्के देऊन तेथून हटवले जाते. देवीचे दर्शन चांगल्या प्रकारे घेता येत नाही. यापुढे देवीचे दर्शन घेण्याची इच्छा झाल्यास आश्रमात जाऊन देवीचे दर्शन घेऊया. तेथे श्रीविष्णूचे अवतार परात्पर गुरु डॉक्टर असल्याने तेथेही तितकेच चैतन्य मिळेल.’

२ उ. कु. नीतू बुडबान, यमुनानगर

२ उ १. प्रार्थना करतांना भ्रमणभाषला ‘रेंज’ नसतांनाही अडचण न येता सोहळा पहाता येणे : ‘काही अडचणीमुळे मला कार्यक्रमातून मध्येच उठून घरी जावे लागत होते. मी देवाला केवळ प्रार्थना केली आणि माझ्या घरी भ्रमणभाषला ‘रेंज’ नसतांनाही अडचण न येता मी सोहळा पाहू शकले.’

२ ऊ. कु. मनीषा लांबा, यमुनानगर

२ ऊ १. ‘सोहळ्याच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पांढऱ्या पोशाखात पाहून मी सकारात्मक झाले. त्या वेळी मला शांतीची अनुभूती आली.

२ ऊ २. ‘परात्पर गुरु डॉक्टरांकडून माझ्या दिशेने पांढरा प्रकाश येत आहे’, असे मी अनुभवत होते.

२ ऊ ३. सोहळ्यापूर्वी मी परात्पर गुरु डॉक्टरांना कधी पाहिले नव्हते. मी त्यांचे छायाचित्र पाहिले होते. सोहळ्याच्या वेळी त्यांना पाहिल्यावर ‘साक्षात् ईश्वरालाच पाहिले’, असे मला वाटले. माझी भावजागृती होऊन मला पुष्कळ रडू आले.

२ ऊ ४. त्या वेळी ‘माझा देह आणि मन यांची शुद्धी होत आहे’, असे मला वाटत होते. त्यांचे हास्य माझ्या मनाला आधार देत होते.

२ ऊ ५. परात्पर गुरु डॉक्टर सर्वकाही सहजतेने सोपे करून सांगत होते. त्या वेळी ‘ईश्वरच स्वतः येऊन सांगत आहे’, असे मला वाटले.

२ ऊ ६. सोहळा ३ घंटे होता; परंतु ‘एवढा वेळ कसा गेला ?’, ते समजलेच नाही.

२ ऊ ७. सोहळ्यातील अनेक संत आणि सद्गुरु यांना पाहून त्यांच्यासारखे राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांच्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळणे : सोहळ्यात अनेक संत उपस्थित होते. त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा भाव पाहून माझ्या मनात विचार येत होते, ‘त्यांना पुष्कळ ज्ञान असूनही ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. ते स्वतःला राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यासाठी समर्पित करू इच्छितात.’ ‘मलाही त्यांच्यासारखे बनायचे आहे’, अशी तळमळ माझ्यात निर्माण होत होती.

२ ऊ ८. श्री भवानीमातेची मूर्ती पाहिल्यावर आलेल्या अनुभूती

अ. मी श्री भवानीमातेची मूर्ती पाहिल्यावर ‘तिच्याकडून पुष्कळ चैतन्य आणि सकारात्मकता मिळत आहे’, असे मला वाटले.

आ. ‘देवीच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर विश्वाचे दर्शन होत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती.’

(सर्व सूत्रांचा मास : मे २०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक