धर्माचे काम हिंसा नसून माणसाला माणूस बनवणे आहे ! – गौर गोपाल दास, प्रेरणादायी वक्ते

गौर गोपाल दास

पुणे – कोणताही सनातन धर्म मानवतेचे काम करत असेल, तर त्याला माझे वंदन आहे. मी देशाचा प्रथम नागरिक असून त्यानंतर मी कोणत्याही जाती-धर्माचा आहे, हे येते. त्यामुळे कोणत्याही अभिवादनापूर्वी ‘वन्दे मातरम्’ हे सर्वांत आधी आपल्या मुखात असले पाहिजे, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते (मोटिव्हेशनल स्पीकर) गौर गोपाल दास यांनी केले. गंगाधाम ते कात्रज कोंढवा रस्त्यावर वर्धमान लॉन्ससमोर आयोजित केलेल्या ‘जीतो कनेक्ट’ परिषदेत ते बोलत होते.

दास पुढे म्हणाले की, जीवनात मोठी स्वप्ने पाहिली, तरच आपण प्रगती करू शकतो. जीवनात प्रतिदिन अनेक अडचणी सर्वांना येतात. सुख-दुःख यांचा चढ-उतार कायम चालू असतो; मात्र त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनात आत्मविश्वास कायम राहिला पाहिजे.