इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण १४.९२ टक्के !
संभाजीनगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची वर्ष २०१८ ते वर्ष २०२० या कालावधीतील ३ वर्षांची आकडेवारी पडताळल्यास इंग्रजी विषयाच्या खालोखाल मराठी विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यात सरासरी प्रतिवर्षी ११.९४ टक्के विद्यार्थी मराठीत अनुत्तीर्ण होतात, तर इंग्रजी विषयात १४.९२ टक्के अनुत्तीर्ण होतात.
राज्यातील कोणत्या विभागात काय आहे परिस्थिती !
१. गेल्या ३ वर्षांत ३७ लाख ८१ सहस्र ६६३ विद्यार्थ्यांनी मराठीची परीक्षा दिली. ३३ लाख ३० सहस्र १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ४ लाख ५१ सहस्र ६४४ अनुत्तीर्ण झाले. या ३ वर्षांत इंग्रजीच्या परीक्षेला ४१ लाख ४३ सहस्र ४८३ मुले बसली. त्यापैकी ३६ लाख ६२ सहस्र ८९७ मुले उत्तीर्ण, तर १४.९२ टक्के मुले अनुत्तीर्ण झाली.
२. नागपूर विभागात इयत्ता १० वीत सर्वाधिक २२.५७ टक्के विद्यार्थी मराठीत, तर इंग्रजीत १५.०६ टक्के अनुत्तीर्ण आहेत. अमरावती येथे १४.३३ टक्के, मुंबई १३.०३ टक्के, कोकणात ४.२५ टक्के मुले मराठीत अनुत्तीर्ण झाली आहेत. लातूर विभागात मराठीत १२.१३ टक्के, तर इंग्रजीत १३.५८ टक्के मुले अनुत्तीर्ण झाली आहेत.
३. नाशिक विभागात ११.७८ टक्के विद्यार्थी मराठीत अनुत्तीर्ण, तर इंग्रजीत ११.४० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली आहेत. संभाजीनगर विभागात १०.८७ टक्के विद्यार्थी मराठीत अनुत्तीर्ण, तर इंग्रजीत ११.८९ टक्के अनुत्तीर्ण आहेत.
इयत्ता १२ वीत उलट परिस्थिती आहे !
इयत्ता १२ वीतील विद्यार्थ्यांची मात्र उलट परिस्थिती आहे. नाशिक विभागात इंग्रजीत १४.५७ टक्के, तर मराठीत ३.०९ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. पुणे येथील इयत्ता १२ वीचे १.९८ टक्के विद्यार्थी मराठीत अनुत्तीर्ण झाले. इंग्रजीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ५ पट असून त्याचे प्रमाण १०.०७ टक्के एवढे आहे. कोल्हापूर २.०२ टक्के मराठीत, तर इंग्रजीत १०.०२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत.
संपादकीय भूमिकामराठीत एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, हे ध्येय शिक्षकांनी ठेवून प्रयत्न करावेत ! |