
संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या निमंत्रणासाठी मनसे पदाधिकार्यांनी शहरातील चौकाचौकांत फलक लावले आहेत. यातील काही फलकांवर राज ठाकरे यांचा उल्लेख ‘हिंदुजननायक’ असा केला आहे. २९ एप्रिल या दिवशी दुपारनंतर शहरात ज्या ठिकाणी राज यांच्या सभेचे फलक लावले आहेत, त्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या सम दुसरा होणे नाही’, असे फलक युवा सेनेकडून शहरातील प्रमुख १० चौकांत लावले आहेत.
राज ठाकरे यांना खासदार इम्तियाज जलील यांचे इफ्तारसाठी निमंत्रण !
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेपूर्वी सायंकाळी इफ्तारसाठी माझ्या घरी यावे. इफ्तार करूनच नंतर सभेला संबोधित करावे, असे जाहीर निमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांद्वारे राज ठाकरे यांना दिले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी २९ एप्रिल या दिवशी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली.
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !