धर्मांधांनी विद्यार्थ्यावर केलेल्या आक्रमणाला लढाऊ वृत्तीने तोंड देणारे अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सनातनचे १०७ वे संत (कै.) पू. डॉ. नंदकिशोर वेद !

कै. पू. (डॉ.) नंदकिशोर वेद

१. आगगाडीतून प्रवास करतांना धर्मांध युवकांनी विद्यार्थिनींची छेड काढणे आणि विद्यार्थ्यांनी त्या धर्मांधांना धरून मारणे : ‘वर्ष १९९५ मध्ये माझ्या बाबांचे (पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचे) सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्यांचे मित्र अन् आम्ही कुटुंबीय, असे सर्व जण अयोध्येहून वैष्णोदेवीला गेलो होतो. तेथून परत येतांना आगगाडी सहारनपूर स्थानकावर आली. तेव्हा तेथे ३ धर्मांध युवक आरक्षण असलेल्या आमच्या डब्यात आले. ते धर्मांध युवक विद्यार्थिनींना पाहून त्यांची छेड काढू लागले. तेव्हा पुढच्या आसंदीवर बसलेले विद्यार्थी धर्मांधांना धरून मारू लागले. ३ धर्मांधांपैकी १ जण पळून गेला आणि एकाने आगगाडीची साखळी ओढली. एकाला तर विद्यार्थ्यांनी चांगलाच चोप दिला.

सौ. क्षिप्रा जुवेकर

२. आगगाडीत पुष्कळ धर्मांध चढणे, त्यांनी विद्यार्थ्यांचा शोध घेणे आणि एका विद्यार्थ्याची ‘कॉलर’ पकडून चाकू बाहेर काढणे : थोड्याच वेळात पुष्कळ धर्मांध  आगगाडीच्या डब्यात चढून त्या विद्यार्थ्यांना शोधू लागले. यावरून ‘धर्मांधांची संपर्कयंत्रणा किती प्रभावी आहे !’, हे लक्षात येते. आगगाडीची साखळी ओढणाऱ्या धर्मांधाला ‘आगागाडी कोठे थांबवली, तर दंगे करण्यास साहाय्य मिळेल ?’, हे ठाऊक होते. ते धर्मांध सरळ आमच्या आसंदीच्या दिशेने आले आणि तेथे एका विद्यार्थ्याची ‘कॉलर’ पकडून त्यांनी चाकू बाहेर काढला.

३. वडिलांनी विद्यार्थी अन् धर्मांध यांच्यामध्ये उभे राहून धर्मांधाला अडवण्याचा प्रयत्न करणे, आईने धर्मांधाचा चाकू धरलेला हात धरून त्याला वडिलांपासून दूर करणे अन् त्यानंतर रेल्वे पोलिसांनी येऊन धर्मांधांना गाडीतून खाली उतरवणे : तेव्हा माझे बाबा विजेच्या वेगाने गेले आणि तो विद्यार्थी अन् धर्मांध यांच्यामध्ये उभे राहिले. बाबा त्या धर्मांधांना म्हणाले, ‘‘याला सोडून दे. त्याची काहीच चूक नाही.’’ एवढ्यात माझी आईने (श्रीमती मिथिलेश कुमारी यांनी) त्या धर्मांधाचा चाकू धरलेला हात पकडून त्याला बाबांपासून दूर केले आणि ती म्हणाली, ‘‘आम्ही येथे सर्व कुटुंबीय बसलेले आहोत. येथे कसलेही भांडण झाले नाही. त्यांना सोडून दे.’’ आम्ही हे सर्व पहात होतो; कारण त्या वेळी जे घडत होते, ते एवढे जलद घडले की, आम्हाला काही समजलेच नाही.

तोपर्यंत रेल्वे पोलीस आले आणि त्यांनी त्या धर्मांधांना आगगाडीतून खाली उतरवले. विद्यार्थ्यांकडून मार खाल्लेल्या गुंडाला पोलिसांनी पकडले. नंतर आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला.

हा प्रसंग माझ्या लहानपणीचा असल्याने तो माझ्या स्मरणात रहाणे कठीणच आहे; कारण त्या वेळी मी फारच लहान होते; परंतु आज हा प्रसंग लिहितांना ‘जणू हे सर्व माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा घडत आहे’, असे मला वाटले.

या प्रसंगात आई-बाबांमधील लढाऊ वृत्तीचा आमच्या मनावर खोल परिणाम झाला. त्या वेळी धर्मांधाच्या हातात चाकू होता आणि तो विद्यार्थ्याला घायाळ करू शकत होता; परंतु बाबांनी स्वतःच्या प्राणांचा विचार केला नाही. त्यांना ‘हे माझे विद्यार्थी आहेत आणि हे माझे प्रथम दायित्व आहे’, असे वाटायचे. आईनेसुद्धा अत्यंत प्रेरणादायक कृती केली. ‘श्री गुरूंनी अशा आई-वडिलांच्या पोटी जन्म दिला’, याबद्दल देवाच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (मुलगी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जळगाव (६.४.२०२२)