प्राध्यापिका अक्सा शेख यांचे मुसलमान पुरुषांना २-३ विवाह करण्याचे कायदाद्रोही आवाहन !

डॉ. अक्सा शेख

नवी देहली – केंद्र सरकार बहुविवाहच्या अवैध असल्याचे घोषित करण्यापूर्वी मुसलमान पुरुषांनी २-३ विवाह करायला हवेत, असे कायदाद्रोही आवाहन ‘जामिया हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस’ या विश्वविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. अक्सा शेख यांनी ट्वीट करून केले आहे. (मुसलमान पुरुषाने असे २-३ विवाह केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम संबंधित महिलांना भोगावे लागतात, असे अनेक उदाहरणांतून पुढे आले आहे. असे असतांनाही पुरुषांना असे आवाहन करणारी प्राध्यापिका मुसलमान महिलांच्या मुळावर उठली आहे, असेच म्हणावे लागेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचे आवाहन केल्याच्या प्रकरणी डॉ. शेख यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !