जमाव तुमच्यावर चालून आला, तर पोलीस वाचवणार नाहीत, त्यामुळे घरात शीतपेयांच्या बाटल्या आणि धनुष्यबाण ठेवा !

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचा लोकांना सल्ला

साक्षी महाराज

उन्नाव (उत्तरप्रदेश) – घरात शीतपेयांच्या बाटल्या, तसेच खरे धनुष्यबाण ठेवा. जर तुमची गल्ली किंवा परिसर यांमध्ये किंवा घरावर अचानक जमाव चालून आला, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का ? जर नसेल, तर करून ठेवा, असे ट्वीट येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले. ‘पोलीस तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाहीत. ते स्वतःचे रक्षण करण्यासाठी कुठेतरी दडून बसतील’, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

साक्षी महाराज यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, जेव्हा लोक जिहाद करून परत जातील, तेव्हा पोलीस दांडके आपटत येतील आणि काही दिवसांनी प्रकरण चौकशी समितीकडे जाऊन समाप्त होईल.