१. ‘जॉ डिस्टोनिया’ या आजारावर ५ वर्षे ‘ॲलोपॅथी’चे उपचार घेणे
‘वर्ष २०१५ मध्ये मला ‘जॉ डिस्टोनिया’ हा रोग झाला. त्यामुळे तोंडातील स्नायूंची सतत आणि अनियंत्रित हालचाल होऊ लागली आणि जबडा सतत उघडा राहू लागला. यावर ‘ॲलोपॅथी’ तज्ञांचे (जबड्याची हालचाल नियंत्रित करणे, हे मेंदूशी संबंधित असल्याने त्यावर उपचार करणाऱ्या संबंधित तज्ञांचे) उपचार चालू झाले. मला गोळ्या आणि २ – ३ मासांनी ‘बोटेक्स’ हे ‘इंजेक्शन’ घ्यावे लागत असे. असे मी ५ वर्षे ‘ॲलोपॅथी’चे उपचार घेतले.
२. कोरोनामुळे दळणवळण बंदी लागू झाल्यानंतर आवश्यक ती औषधे न मिळणे आणि त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चौकटीचे स्मरण होणे
वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी चालू झाली. मी जेथे उपचार घेत होते, ते रुग्णालय प्रतिबंधित क्षेत्रात (रेड झोनमध्ये) येत असल्याने ते बंद करण्यात आले. तेथील आधुनिक वैद्यांनी ‘रुग्णालय पुन्हा कधी चालू होईल’, ते निश्चित सांगता येणार नाही’, असे आम्हाला सांगितले. त्या वेळी मला पुष्कळ त्रास होत होता; पण आवश्यक ती औषधेच मिळत नव्हती. तेव्हा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘आपत्कालात औषधे मिळणार नाहीत, तर आतापासूनच ‘ॲलोपॅथी’ला पर्याय म्हणून आयुर्वेदिय अथवा होमिओपॅथी औषधांचा विचार करा’, अशी चौकट प्रसिद्ध झाली होती, त्याचे स्मरण झाले.
३. होमिओपॅथीचे उपचार घेण्यास आरंभ केल्यावर अल्प कालावधीतच त्याचा चांगला परिणाम जाणवू लागणे
माझे मोठे बंधू होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता हे सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करतात. त्यांना माझ्या आजाराची संपूर्ण माहिती होती. मी त्यांना ‘मला माझी औषधे मिळत नाहीत’, याविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी माझ्यावर होमिओपॅथीचे उपचार करण्यास आरंभ केला. त्यानंतर अल्प कालावधीतच त्या उपचारांचा माझ्यावर चांगला परिणाम जाणवू लागला. नंतर ६ मासांनी माझे ‘ॲलोपॅथी’चे उपचार पूर्ण बंद होऊन आता मागील दीड वर्षापासून मी केवळ होमिओपॅथीचे उपचार घेत आहे.
४. मी संतांनी सांगितलेले नामजपादी उपायही नियमित ३ घंटे करते.
५. होमिओपॅथीचे उपचार आणि संतांनी दिलेले नामजपादी उपाय केल्यामुळे जाणवलेले परिणाम
अ. माझ्या जबड्याची सूज उणावली आहे.
आ. डोक्यापर्यंत जाणवणारी स्नायूंची हालचाल पुष्कळ न्यून झाल्याचे जाणवते.
इ. आता माझ्या जबड्याची अनियंत्रित हालचाल पूर्वीपेक्षा मंदावली असून वेदनांची तीव्रताही उणावली आहे.
हे सर्व परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने शक्य झाले. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अंजली सुरेशचंद्र मेहता (वय ६६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), पुणे (२०.३.२०२२)