‘५.१२.२०२१ या दिवशी मी आश्रमातील काळ्या पाषणाच्या हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तेव्हा या मूर्तीकडे पाहिल्यावर मला ‘ती मूर्ती सजीव असून तिचा श्वासोच्छ्वास चालू आहे, हनुमान दास्यभावात आहे आणि त्याच्या डोळ्यांतून प्रभु श्रीरामाप्रतीचा दास्यभाव व्यक्त होत आहे’, असे जाणवले. त्याची दृष्टी खालच्या दिशेने होती. तेव्हा ‘हनुमान प्रभु श्रीरामाच्या चरणांचे भावपूर्ण दर्शन घेत आहे’, असे जाणवले. हनुमानाच्या मूर्तीकडे पाहिल्यावर माझाही प्रभु श्रीरामाप्रतीचा भाव जागृत झाला. या मूर्तीपासून १ फूट अंतरापर्यंत शक्ती, २ फूट अंतरापर्यंत भाव, ३ फूट अंतरापर्यंत चैतन्य, ४ फूट अंतरापर्यंत आनंद आणि ५ फूट अंतरापर्यंत शांती यांची अनुभूती आली. देवाच्या कृपेने मला दास्यभावातील हनुमानाचे दर्शन झाले आणि त्यांतील दिव्यत्व अनुभवण्यास मिळाले’, यासाठी मी भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |