‘इस्लाममध्ये ‘जिहाद’ शब्दाला पवित्र समजतात; परंतु सध्या जगभरात जिहादच्या नावाने जो आतंकवाद, निरपराध नागरिकांच्या हत्या आणि आर्थिक हानी होत आहे, ते पाहून यावर विश्वास बसणे कठीण जाते. आतंकवाद्यांचा जिहाद स्पष्टपणे दिसून येतो. त्याच्याशी लढण्यासाठी आपले सैन्य आणि सरकार सक्षम आहे; परंतु प्रेमासारख्या शुद्ध भावनेचा वापर करून लव्ह जिहाद केल्याने त्याची वास्तविकता समजणे भोळ्या हिंदु समाजाला कठीण होऊन बसते. एखाद्या वेळी ‘त्यांचे प्रेम खरे आहे’, असे मान्य केले, तरी हिंदु मुलीला सांगण्यासाठी खोटे हिंदु नाव धारण करणे आणि हातात लाल धागा बांधणे आदी कृती कशासाठी ? त्यांना त्यांच्या इस्लामवर विश्वास नसतो का ? याच्याही पुढे जाऊन हिंदु युवतीलाच इस्लाम स्वीकारण्याची बळजोरी का केली जाते ? कोणताही मुसलमान युवक त्याच्या प्रेमासाठी हिंदु धर्माचा स्वीकार का करत नाही ?
१. हिंदु भगिनी लव्ह जिहादमध्ये फसण्याचे कारण
जगावर इस्लामी सत्ता राखणे, हे इस्लामचे स्वप्न आहे ! अर्थात् संपूर्ण जगाला ‘दार-उल्-इस्लाम’ बनवणे ! यासाठी जिहादच्या कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्याची त्यांची सिद्धता आहे, तसेच त्यासाठी जन्नतमध्ये (स्वर्गात) हुर्रे मिळण्याचे स्वप्नही मौलवींकडून त्यांना दाखवले जाते. यात लव्ह जिहाद सर्वांत सोपी पद्धत आहे. हिंदु भगिनींना युवा अवस्थेत प्रेमजाळात फसवणे कठीण नसते; कारण त्यांचे आई-वडील आधीच धर्मनिरपेक्ष झालेले असतात. ते ‘गंगा-जमुना तहजीब’ आणि ‘सर्वधर्मसमभाव’ अशा खोट्या संकल्पना घरी सांगत असतात.
हिंदु घरांमध्ये धर्माचरणाची पद्धत विस्मृतीत गेली आहे. पाश्चात्त्य पुरोगामी परंपरांचे आम्ही नोकर (गुलाम) झालो आहोत. वाढदिवसाला केक कापणे, नवीन वर्ष ३१ डिसेंबरच्या रात्री साजरे करणे आदी कृतींच्या माध्यमातून ख्रिस्ती पद्धतीनुसार आचरण करण्ो हिंदूंना चुकीचे वाटत नाही. याखेरीज इस्लामच्या खऱ्या इतिहासापासून आपण अनभिज्ञ आहोत. त्यामुळे ते याच धर्मनिरपेक्ष विचारसरणीनुसार विचार करतात आणि फसवले जातात. यात हिंदी चित्रपटसृष्टीचाही मोठा प्रभाव आहे. जेवढेही ‘खान’ अभिनेते आहेत, त्या सर्वांच्या पत्नी हिंदु आहेत. यामुळेही सामान्य हिंदु कुटुंबांतील मुली फसवल्या जातात. हिंदु भगिनींना सावधान केल्यावर त्यांचे म्हणणे असते की, ‘माझा प्रेमी इतर मुसलमानांहून वेगळा आहे’; परंतु काही मासांतच त्याची खरी ओळख समोर येते आणि बिचारी दु:खी होते. त्यानंतर त्यांना जीवनात पश्चात्ताप करण्याखेरीज कोणताही पर्याय उरत नाही.
२. लव्ह जिहादमागील एक कारण – अनुवंशिक रोगांपासून मुसलमान मुलांना वाचवणे
लव्ह जिहादच्या ज्या विविध कारणांची चर्चा होते, त्यात चर्चेत न येणारे; पण महत्त्वाचे एक कारण आहे, ‘कॉन्सेंग्युनियस निकाह’मुळे (‘कुटुंबातील व्यक्तींशी निकाह’मुळे) मुसलमान मुलांमध्ये होणाऱ्या अनुवंशिक रोगांपासून त्यांना वाचवणे. ‘दार-उल्-इस्लाम’चे स्वप्न साकार होण्यासाठी मुसलमानांना त्यांची लोकसंख्या जलद गतीने वाढवायची आहे. त्यामुळे मुसलमान कुटुंबांमध्ये ‘कॉन्सेंग्युनियस निकाह’ अर्थात् चुलत आणि मावस बहिणींशी विवाह करण्याची प्रथा चालू झाली. परिणामी त्यांची मुले अनुवंशिक रोगांनी ग्रस्त होत आहेत.
ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात समोर आले की, ब्रॅडफोर्डमध्ये मूळ पाकिस्तानी लोकांचा एक मोठा भाग आहे. या ठिकाणी १७ टक्के पाकिस्तानी मुसलमान आहेत. यातील ७५ टक्के मुसलमान त्यांच्याच समाजातील अर्थात् चुलत बहिणी-भाऊ, मामे बहिणी-भाऊ यांच्याशी निकाह (विवाह) करतात. येथे त्यांच्या मुलांमध्ये अनेक प्रकारचे अनुवंशिक आजार आढळून आले आहेत. त्यानंतर एकूण अभ्यासात समोर आले की, ब्रिटनमध्ये अनुवंशिक आजारांमुळे पीडित असलेल्या मुलांमध्ये १३ टक्के मुले मूळ पाकिस्तानी आहेत. तेथील २०० कुटुंबांचा अभ्यास केल्यानंतर त्यातील ९७ कुटुंबांतील मुले अनुवंशिक आजाराने पीडित आढळली. अशाच प्रकारचे निरीक्षण इस्लामी देशांमध्येही करण्यात आले. तेथेही अशाच प्रकारचा निष्कर्ष आला आहे. सध्या मुसलमान लोकसंख्या शीघ्रतेने वाढत आहे; परंतु त्यांची मुले अनुवंशिक आजारांनी पीडित आहेत. त्यामुळे त्यांचे ‘लक्ष्य’ साध्य होऊ शकत नाही. दुसरीकडे भारतात हिंदु ऋषी-मुनींनी आधीच एक गोत्र आणि कुटुंब यांमध्ये विवाह करणे वर्ज्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हिंदु मुलांमध्ये अशा प्रकारचे दोष आढळून येत नाहीत. ‘हिंदु युवतींशी विवाह केल्यानंतर अशा प्रकारच्या आपत्तीपासून वाचता येते आणि मुसलमान वंश सुरक्षित राहू शकतो’, हेही अन्य धर्मीय युवतींशी लव्ह जिहाद करण्यामागील एक कारण आहे.
३. लव्ह जिहादमुळे होणारी हानी – हिंदु संस्कारांची ‘जीन बँक’ नष्ट होणे
भारतामध्ये मागील ६०० वर्षांच्या इस्लामी आक्रमणात आम्ही मंदिरे आणि संपत्ती गमावली. याच काळात अनेकांना बळजोरीने मुसलमान बनवण्यात आले आणि अनेक हिंदु स्त्रियांना गुलाम बनवून मुसलमान राष्ट्रांमध्ये विकण्यात आले. यातही काही हिंदु राजांनी त्यांच्या पराक्रमाचा परिचय देत त्यांच्या राज्यातील हिंदु प्रजेचे रक्षण केले. त्यानंतर हिंदु धर्माच्या संस्कारशील परंपरेचे वहन आमच्या वंशवृद्धीच्या माध्यमातून चालू आहे. अशा स्थितीत आमच्या एका हिंदु भगिनीने मुसलमानाशी निकाह करणे, म्हणजे तिच्या संस्कारी हिंदु वंश उत्पन्न करण्याच्या क्षमतेचा नाश होऊन तिच्याकडून इस्लामी वंशाचा प्रारंभ करणे आहे. आमीर खान स्वत:ला मोठा आधुनिक धर्मनिरपेक्ष अभिनेता असल्याचे दाखवतो; पण त्यानेही त्याच्या एका संवादात स्पष्टपणे सांगितले की, ‘माझी पत्नी हिंदु असू शकते; पण माझी मुले ही मुसलमानच असतील !’ यातून स्पष्ट होते की, हिंदु युवतींनी लव्ह जिहादमध्ये फसून निकाह केल्याने हिंदूंची संस्कारी ‘जीन बँक’ नष्ट होत आहे.
४. लंडनहून लव्ह जिहादचा प्रारंभ
२९ सप्टेंबर २००९ ला लंडनचे पोलीस आयुक्त सर इयान ब्लेअर यांनी जगात सर्वप्रथम काही कुटुंबांना सतर्क केले होते की, तेथील मुसलमान समाजातील युवक षड्यंत्रपूर्वक हिंदु, शीख आणि ख्रिस्ती युवतींना त्यांच्या प्रेमजालात फसवण्याचे काम करत आहेत. यातील काही युवतींना पाकिस्तानमध्ये घेऊन गेले आणि तेथे त्यांचे काय झाले, हे कुणालाच ठाऊक नाही. त्या कालावधीत लव्ह जिहादला ‘रोमिओ जिहाद’ म्हटले जायचे. पाकिस्तानसारख्या मुसलमान देशात दिवसागणिक अल्पवयीन हिंदु मुलींचे त्यांच्या घरून अपहरण करून बळजोरीने धर्मांतर करण्यात येते; परंतु जेथे मुसलमान अल्पसंख्यांक आहेत, अशा देशांमध्ये असे करणे कठीण आहे. त्यामुळे तेथे प्रेमाच्या जाळ्यात ओढून जिहाद चालू आहे.
५. लव्ह जिहादचा आतंकवादाशी संबंध
वर्ष २०१४ मध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाटणा (बिहार) येथील सभेत बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटासाठी लागणारे अर्थसाहाय्य कर्नाटकातील मंगळुरू येथील आएशा बानोच्या नावाने करण्यात आले होते. तिचे खरे नाव ‘आशा’ आहे. या सामान्य घरातील हिंदु मुलीला प्रेमजाळात फसवून प्रथम तिचे धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर तिच्या नावाने विविध अधिकोषांत ३० खाती उघडण्यात आली. हे खाते उघडतांना तिच्याकडून केवळ स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर या खात्यांचे ‘एटीएम्’ डेबीट कार्ड आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी मुसलमान युवकांना वाटण्यात आले, ज्याविषयी तिला काहीच ठाऊक नव्हते. नंतर त्या खात्यांमध्ये स्फोट करणाऱ्या आतंकवाद्यांसाठी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया येथून जवळपास ५ कोटी रुपये टाकण्यात आले. हे पैसे दुसऱ्या शहरांतून एटीएम् कार्डच्या माध्यमातून काढण्यात येत होते. बॉम्बस्फोटाच्या नंतर काही आतंकवाद्यांना पोलिसांनी पकडले, तर काही आतंकवाद्यांनी पलायन केले. निरपराध आएशा मात्र आतंकवाद्यांना अर्थसाहाय्य करण्याच्या आरोपाखाली कारागृहामध्ये बंद आहे.
अशाच प्रकारे केरळचे काही तरुण आणि तरुणी लव्ह जिहादमुळे धर्मांतर करून मुसलमान बनले. नंतर ते ‘आयएस्आय’च्या खिलाफत युद्धात सहभागी होण्यासाठी सिरीया आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये पळून गेले.
६. बांगलादेशी युवकांचा व्यापाराच्या नावाने लव्ह जिहाद !
आसामचे आमदार शिलादित्य देव यांनी आरोप केला की, ‘बांगलादेशी युवक आसाममध्ये व्यापाराच्या उद्देशाने येतात आणि स्थानिक युवतींना प्रेमजाळात फसवून बांगलादेशात घेऊन जातात. करीमजंगमधील मौसुमी दास ही हिंदु तरुणी पासपोर्ट (पारपत्र) आणि व्हिसा नसतांनाही बांगलादेशी लव्ह जिहादी समवेत बांगलादेशात पळून गेली. नंतर तेथून तिने बुरखा घालून त्या युवकाच्या दबावाखाली येऊन इस्लाम स्वीकारल्याची ध्वनीफीत पाठवली. प्रश्न हा आहे की, पासपोर्ट आणि व्हिसा नसतांना तिला बांगलादेशात प्रवेश कसा मिळाला ?
७. म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांच्या समस्येमागेही लव्ह जिहाद !
लव्ह जिहाद कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संपूर्ण जगभरात पहायला मिळत आहे. म्यानमारमधील बौद्ध नेते अशीन विराथू यांचा आरोप आहे की, ‘मुसलमान युवक बौद्धांच्या मुलींना प्रेमजाळात फसवून विवाह करत होते आणि अधिक मुले जन्माला घालून लोकसंख्या संतुलन बिघडवत होते.’ बौद्ध समाजाला जगभरात सर्वांत अहिंसक आणि शांत स्वभावाचे समजले जाते; परंतु हाच समाज म्यानमारमध्ये विराथू यांच्या नेतृत्वाखाली रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात हिंसक आक्रमणे करत आहे. युरोपातही कट्टर ख्रिस्ती संघटना मुसलमानांवर अशाच प्रकारचा आरोप लावत आहेत.
८. लव्ह जिहादच्या माध्यमातून आतंकवादाचा प्रचार होत असल्याचा कॅथॉलिक चर्चचा आरोप
‘केरळ राज्यातील ख्रिस्ती महिलांना मोठ्या संख्येने फसवून इस्लामिक स्टेट आणि आतंकवादी कारवायांमध्ये ढकलले जात आहे’, असा दावा कॅथॉलिक चर्चने केला आहे. कार्डिनल जॉर्ज ऐलनचैरी अध्यक्ष असणाऱ्या एका पाद्रयांच्या संस्थेने केरळ सरकारवर आरोप लावला की, ‘ते लव्ह जिहादच्या प्रकरणांना गांभीर्याने घेत नाहीत.’ सिरो-मालाबार चर्चने त्यांच्या वक्तव्यात म्हटले आहे की, केरळमध्ये लव्ह जिहादच्या नावावर ख्रिस्ती मुलींना ठार करण्यात आल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. केरळमध्ये सुनियोजित पद्धतीने लव्ह जिहादसाठी ख्रिस्ती तरुणींना लक्ष्य करण्यात येत आहे.
पाद्रयांच्या धर्मसभेने पोलीस नोंदीचे उदाहरण देऊन सांगितले की, ‘ज्या २१ लोकांना ‘आयएएस्’मध्ये भरती करण्यात आले होते, त्यातील अर्धे धर्मांतरित ख्रिस्ती होते. या घटनेने संपूर्ण समाजाचे डोळे उघडायला पाहिजे. असेही समजले की, लव्ह जिहादच्या माध्यमातून अनेक मुलींना आतंकवादी कारवायांमध्ये वापरण्यात येत आहे. हे एक गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे लव्ह जिहाद हा काल्पनिक नाही.’ चर्चने लव्ह जिहादमध्ये सहभागी दोषींच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. यात आई-वडिलांना त्यांच्या मुलांना लव्ह जिहादविषयी सतर्क करण्याचेही आवाहन केले आहे.
९. हिंदु भगिनींना जागृत करणे आणि त्यांना वाचवणे आपले कर्तव्य !
एक काळ होता, जेव्हा राणी पद्मिनी, राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, महाराणी ताराबाई या हिंदु विरांगनांनी त्यांच्या पराक्रमाने विदेशी आक्रमणकर्त्यांशी लढणे आणि धर्मांतर करण्यापेक्षा बलीदान करणे स्वीकारले होते. आज त्यांचीच पुढील पिढी अज्ञानापोटी स्वत:च आक्रमणकर्त्यांच्या प्रेमजाळात फसून स्वत:चे जीवन उद्ध्वस्त करून घेत आहे. या भगिनींना जागृत करणे आणि त्यांना वाचवणे आपले कर्तव्य आहे.’
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.