गडचिरोली येथे प्राणहिता नदी किनाऱ्यावर पुष्कर कुंभमेळाव्यास प्रारंभ !

२५ सहस्र भाविकांची गर्दी !

गडचिरोली – जिल्ह्यातील प्राणहिता नदीवर १३ ते २४ एप्रिल या कालावधीत पुष्कर कुंभमेळावा होत आहे. २ दिवसांत या मेळाव्यात महाराष्ट्र, तेलंगाणा, छत्तीसगड आणि कर्नाटक राज्यांतून २५ सहस्र भाविकांनी शाही गंगास्नान करून दर्शन घेतले. गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी आणि यमुना या ५ नद्यांमध्ये शाही पवित्र स्नान करून कर्नाटक राज्यातील ७ महिला भाविक पुष्कर दर्शन घेण्यासाठी येथे आल्या आहेत. हिंदु पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे देशातील १२ नद्यांवर १२ वर्षांतून एकदा पुष्कर कुंभमेळावा आयोजित केला जातो.