१० वीपर्यंत ‘हिंदी’ विषय अनिवार्य करण्यास ईशान्येकडील राज्यांचा विरोध !

संस्कृत ही सर्वच भाषांची जननी असून ती समृद्ध भाषा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता भारतात संस्कृत अनिवार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच भाषाप्रेमींना वाटते ! – संपादक

गौहत्ती (आसाम) – केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत ‘हिंदी’ हा विषय अनिवार्य करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आसाम साहित्य सभेसह ईशान्येकडील अनेक संस्था आणि संघटना यांनी विरोध केला आहे. हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.

आसाममधील विरोधी पक्षांनी ‘सांस्कृतिक साम्राज्यवादाकडे टाकलेले हे पाऊल आहे’ अशी टिप्पणी केली आहे. काँग्रेस आणि आसाम जातीय परिषदेसह अन्य विरोधी पक्षांनी ‘हा निर्णय लोकांच्या हिताच्या विरोधात असल्याने मागे घ्यावा’, अशी मागणी केली आहे.