हिंदूंना न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

सभेत मार्गदर्शन करतांना श्री. किरण दुसे

तळंदगे (जिल्हा कोल्हापूर), ६ एप्रिल (वार्ता.) – आपल्याला जन्महिंदु पासून कर्महिंदु असा प्रवास करायचा आहे. आपल्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. आपले धर्मपुरुष हे सारे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्रपुरुष हे धर्म पाळणारे आहेत. हिंदु सहिष्णु, असंवेदनशील आणि हिंसक आहेत, असे षड्यंत्रपूर्वक वातावरण निर्माण केले जात आहे. अशाप्रकारे हिंदुविरोधी प्रचार हिंदूंना गुन्हेगार ठरवत आहे. ही स्थिती पालटून न्यायाचे राज्य आणण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी ४ एप्रिल या दिवशी केले. ते तळंदगे गावातील जगन्नाथ मंदिरात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.

सभेत मार्गदर्शन करतांना श्री. किरण दुसे आणि उपस्थित धर्माभिमानी

या सभेसाठी २५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी श्री. किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. शिवाजी मोटे यांनी फेटा घालून श्री. किरण दुसे यांचा सन्मान केला. या प्रसंगी श्री. शिवाजी मोटे यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले.

सभेच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतांना श्री. किरण दुसे

जगन्नाथ मंदिरातील विश्वस्त आणि पुजारी यांनी सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याविषयी समितीने त्यांचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष श्री. अरुण यादव, हुपरी येथील चांदीचे व्यावसायिक श्री. शत्रुघ्न ससे, धर्मप्रेमी श्री. राहुल ससे उपस्थित होते.

सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन पहातांना धर्माभिमानी
सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन पहातांना धर्माभिमानी

विशेष

१. सभेच्या अगोदर जोरदार पाऊस आला. या वेळी भगवान जगन्नाथ आणि भगवान श्रीकृष्ण यांना प्रार्थना केल्यावर, तसेच नामजप केल्यावर पाऊस थांबला.

२. तळंदगे गावाताल सरपंच सौ. जयश्री संजय भोजकर सभेसाठी उपस्थित होत्या आणि त्यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असून अशा सभा गावोगावी व्हायला हव्यात. त्यासाठी आमचे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील’, असे मत व्यक्त केले.

या वेळी श्री. दुसे पुढे म्हणाले, ‘‘शासकीय अनुदानातून चालणार्‍या शिक्षण संस्थांमधून केवळ हिंदु धर्म शिकवण्यास प्रतिबंध आहे. म्हणजे हिंदूंच्या हिंदुस्थानात शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते; पण भगवद्गीता आणि हिंदु धर्म ग्रंथ शिकवले जाऊ शकत नाही, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे आहे.’’

सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले धर्मशिक्षणविषयक फलक पहातांना धर्माभिमानी

क्षणचित्रे

१.  मंदिराचे सभागृह भरल्यानंतर धर्माभिमानी हिंदूंनी सभागृहाच्या बाहेर बसून आणि काहींनी उभे राहून सभा ऐकली.

२. सभेच्या अगोदर मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही धर्माभिमानी हिंदू सभेसाठी उपस्थित राहिले.

३. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शिवाजी मोटे आणि श्री. शिवाजी शिनगारे यांनी सभेपूर्वी ७ बैठकांचे आयोजन करून गावातील प्रत्येक भागात प्रसार केला, तसेच सभेच्या आयोजनांमध्ये गावातील काही युवकांनी पुढाकार घेऊन उत्स्फूर्तपणे सेवा केल्या.

४. हुपरी, रेंदाळ, यळगुड, पट्टणकोडोली या गावांतील काही धर्मप्रेमी सभेसाठी उपस्थित होते.

५. सभा झाल्यावर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

६. सभेच्या आयोजनामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री अक्षय पाटील, युवराज खरात, सचिन फडतारे, देवराज सिसाळे, शिवाजी शिनगारे, अविनाश शिरोळे, अजित जंगम यांचा सेवेत उत्स्फूर्त सहभाग लाभला.

७. धर्मप्रेमी श्री. राजेंद्र मोरे यांनी त्यांच्या मुलीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या फ्लेक्सप्रदर्शनातील प्रत्येक फलक वाचून दाखवला आणि त्याचे महत्त्व सांगितले.

८. तळंदगे येथील सर्व धर्मप्रेमी आणि धारकरी यांनी सभा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.