मेगरवळ्ळी (तालुका शिवमोग्गा) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
तीर्थहळ्ळी (कर्नाटक) – हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगण्याचे कार्य हिंदु राष्ट्र- जागृती सभेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रत्येक हिंदूने धर्माचरण केले, तर आपले आणि आपल्या स्त्रियांचे रक्षण होईल. त्यामुळे प्रत्येक घरी धार्मिक आचरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मेगरवळ्ळी येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानाचे अध्यक्ष श्री. नरसिंहमूर्ती भट यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मार्च २०२२ या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भव्या गौडा यांनीही या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. सभेनंतर झालेल्या गटचर्चेच्या वेळी धर्मप्रेमींकडून आणखी काही ठिकाणी सभा, धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी करण्यात आली.
२. श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष श्री. नरसिंहमूर्ती भट यांनी समितीची गुढीपाडव्याची शुभेच्छापत्रे निःशुल्क वाटण्यासाठी खरेदी केली आणि उपस्थितांमध्ये वितरण केली.
३. एका धर्मप्रेमीने साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या कन्नड भाषेतील ‘गुढीपाडवा विशेषांक’ खरेदी करून निःशुल्क वितरित केले.