अखिल मानवजातीच्या उद्धारार्थ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची गुढी उभारण्यासाठी अहर्निष कार्यरत असणारी महान विभूती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! ‘हिंदु राष्ट्र’ हे धर्माच्या अधिष्ठानावरच उभे रहाणार असल्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वत्र धर्मप्रसाराचे कार्य होणे नितांत आवश्यक आहे. धर्मप्रसाराचे कार्य होण्यामध्ये ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती यांपैकी ज्ञानशक्तीचे योगदान सर्वाधिक आहे. ज्ञानशक्तीच्या माध्यमातून कार्य होण्याचे सर्वांत प्रभावी माध्यम म्हणजे ‘ग्रंथ’ !
१. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा आपत्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक ग्रंथ प्रसिद्ध करण्याविषयी झालेला अव्यक्त संकल्प !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी साधारण वर्षभरापूर्वी सांगितले होते, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी, घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वीच ‘ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार करणे’, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ साधना आहे !’ अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथनिर्मितीचे कार्य अधिक गतीने होण्याच्या दृष्टीने एकप्रकारे अव्यक्त संकल्पच झालेला आहे. या संकल्पाचीच फलश्रुती म्हणून गेल्या वर्षभरात सनातनचे ग्रंथकार्य अनेक पटींनी वाढले ! पुढे दिलेल्या काही सूत्रांवरून हे लक्षात येते.
२. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत विविध भाषांत मिळून ३० नवीन ग्रंथ-लघुग्रंथ प्रसिद्ध !
३. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत विविध भाषांत मिळून ३५७ ग्रंथ-लघुग्रंथ यांचे पुनर्मुद्रण !
४. ‘कोरोना’ महामारीमुळे ग्रंथविक्रीच्या संदर्भात मर्यादा असूनही ग्रंथांची झालेली प्रचंड विक्री !
‘कोरोना’ महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून जानेवारी २०२२ पर्यंतच्या काळात बहुतांशी भागांत दळणवळण बंदी लागू होती. त्यामुळे घरोघरी जाऊन किंवा सार्वजनिक ठिकाणी अध्यात्मप्रसार करण्यास पुष्कळ मर्यादा होत्या. त्यामुळे या काळात सनातनच्या ग्रंथांचे नेहमीप्रमाणे विक्रीकेंद्रांवरून वितरण होऊ शकले नाही. असे असले, तरी ‘sanatanshop.com’, नियतकालिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारी विज्ञापने (जाहिराती), सामाजिक संकेतस्थळांवरील ‘पोस्ट’ इत्यादींच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात सनातनच्या ५,४४,९४३ ग्रंथांची विक्री झाली ! यावरून सनातनवर असलेली ईश्वरी कृपा आणि समाजाला वाटणारे सनातनच्या ग्रंथांचे महत्त्वही लक्षात येते.
५. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला वाचकांचा उदंड प्रतिसाद !
परात्पर गुरु डॉक्टरांच्या अव्यक्त संकल्पामुळे सप्टेंबर २०२१ पासून सनातन संस्थेचा राष्ट्रव्यापी ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ हा उपक्रम आरंभ झाला. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ग्रंथांचा प्रसार होत असून समाजातून या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसादही लाभत आहे. या अभियानाच्या अंतर्गत अवघ्या ६ मासांतच मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या ५ भाषांतील ३,२७,३६३ ग्रंथांची विक्री झाली आहे !
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथकार्यात सहभागी झाल्याने होणारी शीघ्र आध्यात्मिक उन्नती !
आगामी काळ ‘कोरोना’ महामारीपेक्षाही महाभयानक संकटांचा काळ असणार आहे. या काळात केवळ ‘धर्माचरण आणि साधना’, हेच मानवासाठी तारणहार बनतील. काळानुसार योग्य धर्माचरण आणि कृतीच्या स्तरावरील साधना केवळ सनातनचेच ग्रंथ शिकवतात. यासाठीच आजही परात्पर गुरु डॉक्टर वयाच्या ७९ व्या वर्षी प्राणशक्ती अतिशय अल्प असतांनाही ग्रंथकार्य वाढण्यासाठी तळमळीने कार्यरत आहेत. त्यांच्या अव्यक्त संकल्पाने ग्रंथकार्य एवढे उदंड वाढू शकते, तर त्या ग्रंथकार्यात आपण तन, मन आणि धन यांनी सहभागी झालो, तर आपलीही उदंड आध्यात्मिक उन्नती का होणार नाही ?
७. सर्वांना ग्रंथकार्यात सहभागी होण्याची नम्र विनंती !
परात्पर गुरु डॉक्टर संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी फेब्रुवारी २०२२ पर्यंत ३५१ ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली आहे. अन्य सुमारे ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत आपण सहभागी होऊ शकता. याचसह ग्रंथांचा प्रसार करणे, ग्रंथांसाठी अर्पण किंवा विज्ञापने (जाहिराती) देणे किंवा मिळवणे, ग्रंथांचे वितरण करणे आदी सेवांमध्येही आपण सहभागी होऊ शकता. ‘सर्वांनीच या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा !’, ही नम्र विनंती !
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (६.३.२०२२)
हिंदु धर्मातील सण, उत्सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !
सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्रसनातनच्या या ग्रंथात वाचा…
सनातनचे ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७ |