दर्यापूर (जिल्हा अमरावती), २९ मार्च (वार्ता.) – येथे नुकतेच हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांनी सभेला संबोधित केले. समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी समितीच्या कार्याचा आढावा सांगितला. श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी ‘हिंदु धर्मावर होणारे आघात आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर सौ. अनुभूती टवलारे यांनी ‘महिलांवर होणारे अत्याचार आणि स्वरक्षण प्रशिक्षण काळाची आवश्यकता’ याविषयी आपले मत व्यक्त केले. सभेला २०० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली.
क्षणचित्रे
१. सभेनंतर २० धर्माभिमान्यांनी वक्त्यांशी चर्चा करून समितीच्या कार्यामध्ये सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.
२. सभेच्या शेवटी कु. गिरिजा नीलेश टवलारे (वय ९ वर्षे) हिचा ऑडियो ऐकवण्यात आला. यात तिने ‘महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार करावा आणि धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करावे’, असे आवाहन केले.
३. दर्यापूर येथील धर्मप्रेमी सर्वश्री दीपक काटोले, संजय राणे, ओम राणे, गौरव बैताडे यांनी सभेच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतला. या सर्वांनी सभेचा प्रसार आणि सर्व नियोजन पुढाकाराने केले.
सहकार्य
श्री रामदेव बाबा विश्वस्त मंडळ, श्री रामायण सेवा समिती, श्री. पंकज राठी, गुल्हाने प्रिंटर्स, श्री. अजय ब्रदिया, श्री. सुरेश झंवर यांनी सभेच्या आयोजनासाठी सहकार्य केले.