हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्वांना अहोरात्र प्रयत्न करावे लागणार ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

श्री क्षेत्र देहू येथे तुकाराम बीजनिमित्त धर्मसभा आणि महाअधिवेशन !

मार्गदर्शनाला उपस्थित धर्माभिमानी

पुणे, २३ मार्च (वार्ता.) – जगामध्ये प्रत्येक धर्माचे स्वतंत्र राष्ट्र आहे; मात्र कुठेही हिंदूंसाठी असणारे हिंदु राष्ट्र नाही. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्वांना अहोरात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे लोटली, तरी आपण ब्रिटिशांनी सांगितलेली शिक्षणपद्धत, कायदे पद्धत वापरत आहोत. देशामध्ये अनेक प्रकारचे जिहाद आहेत. हलाल अर्थव्यवस्थेसारखी समांतर अर्थव्यवस्था अस्तित्वात येऊ पहात आहे. यामुळे स्थानिक व्यवसाय बंद होऊ शकतात. ज्यांनी हलाल प्रमाणपत्र घेतले आहे, अशा व्यक्तींचा व्यवसाय चालू ठेवण्याचे हे कारस्थान आहे. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितले. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीजनिमित्त श्री क्षेत्र देहू येथे धर्मसभा आणि महाअधिवेशन यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. पराग गोखले यांनी धर्मसभा का घ्यावी लागत आहे ? याविषयी मार्गदर्शन केले.

श्री. पराग गोखले

सभेमध्ये केलेले आवाहन

१. प्रत्येकाने दैनिक ‘सनातन प्रभात’चे ‘ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे.

२. प्रत्येक बुधवार आणि शनिवार या दोन दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या यू ट्यूब वाहिनीवरून घेतला जाणारा ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ हा कार्यक्रम सर्वांनी पहावा.

३. ‘सनातन चैतन्यवाणी’ ‘ॲप’ डाऊनलोड करावे. त्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये स्तोत्र, मंत्र, आरत्या, श्लोक ऐकले आणि म्हटले जातील.

धर्मसभेत मार्गदर्शन करतांना श्री. पराग गोखले यांनी पू. निवृत्ती महाराज यांच्या वाक्याची आठवण सांगितली. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे आमच्यासाठी बहिर्जी नाईक प्रमाणे काम करते. ‘सनातन प्रभात’ हे आमचे डोळे आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या धर्मावर होणारे आघात कळत आहेत. अन्यथा एवढे आघात होत असतांना इतर वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे कळणे पुष्कळ कठीण किंबहुना अशक्य आहे’, असे उद्गार वैकुंठवासी गुरुवर्य ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी काढले होते.