बिहारमध्ये हनुमान मंदिराच्या वृद्ध अपंग पुजार्‍यावर गोळ्या झाडल्या

बिहारमध्ये राज्य कुणाचे सरकारचे कि गुंडांचे ? – संपादक

हनुमान मंदिराचे वृद्ध अपंग पुजारी काशीनाथ पांड्ये

पटणा (बिहार) – बिहारमध्ये गुंडांची दहशत वाढत आहे. एका ताज्या प्रकरणात बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील धनसोई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडवा गावच्या हनुमान मंदिराचे वृद्ध अपंग पुजारी काशीनाथ पांड्ये यांच्यावर अज्ञातांनी ३ गोळ्या झाडल्या.

पुजारी मंदिराच्या एका खोलीत झोपले होते. त्याच वेळी आरोपींनी त्यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून गावकर्‍यांनी चारी बाजूंनी मंदिराच्या दिशेने धाव घेत पोलिसांना माहिती दिली. घायाळ पुजार्‍यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.