हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘सरकारी भूमीवर अवैध अतिक्रमण – लँड जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
मुंबई – रस्ते, पूल, स्थानके आदी ठिकाणी अतिक्रमण करून मशिदी आणि मजार उभारणे, हे देहली अन् गुरुग्राम यांसारख्या शहरांत नित्याचे झाले आहे आणि याला विरोध केला, तर वक्फ बोर्ड त्यांच्यासाठी धावून येतो. आपल्या परिसरात दिसणारी अशी अतिक्रमणे रोखण्यासाठी पोलीस-प्रशासनाकडे प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन तक्रारी प्रविष्ट करण्यासाठी जागरूक नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे.
योग्य प्रकारे तक्रारी प्रविष्ट केल्यास पोलीस-प्रशासनाला त्याची नक्कीच नोंद घ्यावी लागेल. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी आता प्रयत्न न केल्यास पुढे हिंदूंसाठी कठीण स्थिती होऊन बसेल, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘सरकारी भूमीवर अवैध अतिक्रमण – लँड जिहाद ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
या विशेष संवादामध्ये अखिल भारत हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. सुरेश जैन, कर्नाटक येथील उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मीरा राघवेंद्र आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा हेही सहभागी झाले होते.
हिंदूंनी अवैध गोष्टींना पुढे येऊन विरोध केला पाहिजे ! – सुरेश जैन, अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा
महाराष्ट्र, राजस्थान आदी राज्यांत गड-किल्ल्यांवर अवैधपणे मशिदी उभारल्या आहेत. या दोन्ही राज्यांतील सरकार मूक-बधीर झाले आहे. या अवैध गोष्टींना हिंदूंनी पुढे येऊन विरोध केला पाहिजे. हिंदु आता जागृत होत आहे. ही अतिक्रमणे रोखण्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने सर्वतोपरी विरोध करू.
‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करणे आवश्यक ! – अधिवक्त्या मीरा राघवेंद्र, कर्नाटक उच्च न्यायालय
देशभरातील विविध राज्यांत रस्ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्याच्या घटना वाढत आहेत. धर्मांधांचा चालू असलेला ‘लँड जिहाद’ रोखण्यासाठी देशात कायदा करण्याची आवश्यकता आहे. आज देशात हिंदु असुरक्षित आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदूंना विविध प्रकारे कार्य करतांना कायद्याचे साहाय्य मिळणे आवश्यक आहे.
हे पहा –
♦ हिन्दू जनजागृति समिति आयोजित
🚩 विशेष संवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की… ⭕ सरकारी भूमि पर अवैध अतिक्रमण ‘लैंड जिहाद’ ?
सरकारी भूमि पर अवैध अतिक्रमण 'लैंड जिहाद' ? Encroachment on government land : Land Jihad https://t.co/fyKHlFkxbC
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) February 5, 2022
______________________________
देशात सरकारी आणि अन्य भूमींवर धर्मांधांकडून अतिक्रमण होणे, हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील रेल्वेस्थानकाच्या फलाटावरील कामगारांच्या विश्रांतीगृहाचे धर्मांधांनी अवैधपणे मशिदीत रूपांतर केले होते. मशिदीला हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला. परिणामी येथील विश्रांतीगृह पूर्वस्थितीत आणावे लागले. बेंगळुरूसह देशात विविध ठिकाणी सरकारी आणि अन्य भूमींवर धर्मांधांकडून अतिक्रमण होत असून हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. हिंदूंनी जागृत होऊन ते रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे.