आरोग्याला हितकारी असलेल्या रंगांनी धूलिवंदन खेळा !

१८ मार्च २०२२ या दिवशी ‘धूलिवंदन’ आहे. त्या निमित्ताने…

‘धूलिवंदन खेळा; परंतु रासायनिक रंगांनी नाही, तर पळसाच्या फुलांचे आणि इतर नैसर्गिक रंग बनवून खेळा ! नैसर्गिक रंग हे तोंडवळा आणि त्वचा यांसाठी सुद्धा लाभदायक असतात. ते रंग आपण घरच्या घरी बनवू शकतो.

 नैसर्गिक रंग बनवण्याची कृती

१. हिरवा रंग : पालक, कोथिंबीर किंवा पुदिना यांची पाने कुटून पाण्यात मिसळल्यावर हिरवा रंग सिद्ध करू शकतो.

२. लाल रंग : लाल गुलाबाच्या पाकळ्या चांगल्या प्रकारे सुकवून कुटून पिठात मिसळल्यावर लाल रंगाचा गुलाल बनवू शकतो.

३. केसरी रंग : चिमूटभर चंदनाचे चूर्ण एक लिटर पाण्यात मिसळल्यावर केसरी रंग सिद्ध होतो.’

(साभार : मासिक ‘ऋषिप्रसाद’, फेब्रुवारी २०१८, अंक ३०२)