
लंडन (ब्रिटन) – भारतीय वंशाचा गुरभेज सिंह नावाच्या २६ वर्षीय तरुणाची पश्चिम लंडनमधील साऊथॉल परिसरात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. नॉर्थ रोड आणि डॉर्मर्स वेल्स लेन परिसरातील एका दुकानाबाहेर हा प्रकार घडला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी गंभीर घायाळ अवस्थेत असलेल्या गुरभेज सिंह यास वाचवण्याचे प्रयत्न केले; परंतु त्याचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक व्यक्ती घायाळ झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांना कह्यात घेतले होते. प्राथमिक अन्वेषणानंतर ६ जणांची सुटका करण्यात आली, तर एका व्यक्तीला जामिनावर सोडण्यात आले आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सखोल अन्वेषण चालू आहे.
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !