५ अणूबाँब बनवण्याची साठ्याची क्षमता
तेहरान (इराण) – इराणने त्याचा सर्वांत मौल्यवान आणि धोकादायक अणूसाठा अत्यंत सुरक्षित ठिकाणी हालवला आहे, असा दावा अमेरिकी गुप्तचर संस्था आणि आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्था यांनी केला आहे. इस्रायल किंवा अमेरिका यांच्या हवाई दलांद्वारे अणू-सुविधा नष्ट केल्या जाण्याच्या भीतीने इराणने पर्वतांमध्ये खोदलेल्या भूमीखालील बंकर्समध्ये अनुमाने ५०० किलो अत्यंत समृद्ध, म्हणजेच ‘बाँब-ग्रेड युरेनियम’ लपवून ठेवले आहे. सैनिकी कारवाई किंवा बाह्य दबाव यांद्वारे हे साहित्य परत मिळवणे आता जवळपास अशक्य मानले जात आहे.
🚨 Strategic Shift: Iran’s Nuclear Capability
Reports reveal Iran has moved 500kg of 90% "bomb-grade" uranium into deep, fortified mountain bunkers at Natanz and Fordo. 🏔️☢️Key takeaways:
🔹 Enough material for 5+ atomic bombs.🔹 Capability to declare as a nuclear state at… pic.twitter.com/5NzFxAJo3G
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 14, 2026
इराण केव्हाही स्वतःला ‘अधिकृत अणूसज्ज राष्ट्र’ म्हणून घोषित करण्यास सक्षम !
१. आंतरराष्ट्रीय अणूतज्ञांच्या मते, इराणने लपवलेले ५०० किलो युरेनियम सामान्य दर्जाचे नसून ते ९० टक्के शुद्धतेपर्यंत समृद्ध करण्यात आले आहे.
२. अणूविज्ञानाच्या निकषांनुसार या पातळीपर्यंत समृद्ध केलेले युरेनियम केवळ प्राणघातक अणूशस्त्रे किंवा अणूबाँब सिद्ध करण्यासाठी वापरले जाते.
३. ५०० किलोचा हा प्रचंड साठा अत्यंत अल्प काळात किमान ५ विनाशकारी अणूबाँब बनवण्यासाठी पुरेसा आहे.
४. हे साहित्य सुरक्षित करून इराणने अशी धोरणात्मक क्षमता प्राप्त केली आहे की, तो कोणत्याही क्षणी जगासमोर स्वतःला ‘अधिकृत अणूसज्ज राष्ट्र’ म्हणून घोषित करू शकतो.
इराणमध्ये कुठे आहे हा साठा ?
इराणच्या नतान्झ आणि फोर्डो येथील सर्वांत सुरक्षित आणि अभेद्य अशा भूमिगत अणू-सुविधांमध्ये हा युरेनियम साठा हालवण्यात आला आहे. ही केंद्रे पर्वतांच्या आत खोलवर भूमीखाली शेकडो फूट घट्ट ग्रॅनाईट खडकात कोरून बनवण्यात आली असून त्यांना काँक्रीट आणि लोखंड यांच्या अनेक थरांचे संरक्षणकवच आहे.
अमेरिका आणि इस्रायल यांच्या सैन्यांना साठा मिळणे अशक्य !संरक्षण तज्ञांचे स्पष्ट म्हणणे आहे की, या बंकर्सची खोली आणि त्यांची रचना इतकी सशक्त आहे की, अमेरिकेचे सर्वांत शक्तीशाली ‘बंकर-बस्टर’ बाँब किंवा इस्रायलची अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तिथे पोचून त्यांचा नाश करण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. यामुळेच हे युरेनियम बळाचा वापर करून नष्ट करण्याच्या किंवा हस्तगत करण्याची पाश्चात्त्य राष्ट्रांची आशा मावळली आहे. |

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan