हर्ष यांची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी !

अशी मागणी का करावी लागते ? 

बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात कार्यकर्त्यांची मागणी  

निषेध आंदोलनात सहभागी कार्यकर्ते

सोलापूर, २३ फेब्रुवारी – शिवमोग्गा (कर्नाटक) येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष (वय २६ वर्षे) यांची अज्ञातांनी चाकूने वार करून हत्या केली. या हत्येचा निषेध करण्यासाठी येथे बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पूनम गेट येथे निदर्शने केली. या वेळी हर्ष यांची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

निषेध आंदोलनात सहभागी कार्यकर्ते

या आंदोलनाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेतले होते. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या वेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.