केवळ गुन्हा नोंद नव्हे, तर शासकीय नियम तोडणार्यांना शिक्षा होईपर्यंत पोलिसांनी पाठपुरावा करायला हवा !
खेड – तालुक्यातील वेरळ या ठिकाणी ‘हजरत जलालशहा बाबा’ यांच्या उरूस (मुसलमानांचा धार्मिक उत्सव) कार्यक्रमात २० फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विनापरवाना आकाशपाळणा लावून गर्दी जमवल्याबद्दल मुस्तफा असगर शेख (वय ४९ वर्षे, साहिलनगर, महाड) आणि हिदायत अब्दुल्ला मल्लानी (वय ५२ वर्षे, साठेमोहल्ला, खेड) या दोघांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोविड-१९ च्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.