करूनी साधना बदलूया मना ।
संघटित होऊ या ।
आपण संघटित होऊ या ॥ धृ ॥
घराघरांमध्ये शिरला कली ।
कुणी ना आता आम्हा वाली ।
सनातनच्या कार्यामध्ये
सहभागी होऊ या ।
आपण संघटित होऊ या ।। १ ।।
क्षात्रधर्म साधना करूया ।
गुरुआज्ञेचे पालन करूया ।
स्वभावदोष अन् अहं निर्मूलन कृतीमध्ये घडवूया ।
आपण संघटित होऊ या ।। २ ।।
बालक येती संस्कार वर्गा ।
पालक जमती सत्संगा ।
साधनेचे महत्त्व सार्या घरोघरी सांगूया ।
आपण संघटित होऊ या ।। ३ ।।
व्यष्टी बरोबर समष्टी (टीप १) करूया ।
निसर्ग आणि सृष्टी पाहूया ।
विधात्याच्या कार्यामधूनी परमेष्टी जाणूया ।
आपण संघटित होऊ या ।। ४ ।।
टीप १ : व्यष्टी आणि समष्टी साधना.
– सौ. रश्मी बापट, सातारा रस्ता, पुणे. (मे २०२१)